Funny dance video: सोशल मीडिया एक अशी गोष्ट आहे, जी तुम्हाला एका रात्रीमध्ये फेमस करते. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा अजिबात नेम नाही. दररोज अनेक व्हिडीओ व्हायरल होतात. सोशल मीडियावर व्हायरल होणारे काही व्हिडिओ पाहिल्यानंतर आपण आश्चर्यचकित होतो. तर काही व्हिडीओ इतके मजेशीर असतात की, ते बघितल्यानंतर तुम्ही हसल्याशिवाय राहणार नाहीत. सध्या असाच एका महिलेचा डान्स व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घालतो आहे.
सध्या सोशल मीडियावर एका महिलेच्या डान्सचा व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. नक्कीच हा व्हायरल होणारा व्हिडीओ तुम्ही बघितल्यानंतर पोट धरून हसाल.कोणी ब्रेक डान्स करतं, कोणी मादक असा बेली डान्स करतं, तर कोणी बॉलिवूड स्टाईल डान्स करतं. आजकाल लोक फेमस होण्यासाठी नको नको ते करतात. अनेकदा तर लोक असे कारनामे करतात ज्याबाबत सत्य जाणून घेतल्यावर थक्क व्हायला होतं. काही लोकांना यात यश मिळतं तर अनेकांचा पोपटही होतो. सोशल मीडियावर एक असाच व्हिडीओ सध्या लोकांना पाट धरून हसायला भाग पाडत आहे. लोकांना हा व्हिडीओ इतका आवडला की, लोक पुन्हा पुन्हा हा व्हिडीओ बघत आहेत. पहिल्यांदा तर तुम्हाला हा व्हिडीओ फार सामान्य वाटेल. पण जसा व्हिडीओ समोर येईल तसा तुम्हाला धक्का बसेल. इतकंच नाही तर तुम्हाला धक्का बसल्यावर तुम्ही जागेवर उडीही मारू शकता. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की, या व्हिडीओत असं काय आहे? तर या व्हिडीओत एक ‘महिला’ अक्षरश: उड्या मारून मारून डान्स करतेय.
या व्हिडीओमध्ये ही महिला डोक्यावर टोपी आणि गॉगल घालून जबरदस्त डान्स करताना दिसते. ती ‘हुस्न तेरा तोबा तोबा’ या गाण्यातील सिग्नेचर स्टेप्स करतेय, पण ज्या पद्धतीनं तिनं त्या सादर केल्या आहेत, ते पाहून खरंच तुमचं डोकं चक्रावून जाईल. तसेच तिच्या मागे जो मुलगा उभा आहे त्याला पाहूनही तुम्हाला दया येईल.
पाहा व्हिडीओ
आता तुम्ही विचार करत असाल की लोकांमध्ये इतकं टॅलेंट येतं कुठून. तर त्याचं काही उत्तर नाही. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे. हा व्हिडीओ seemamishra070 नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअऱ करण्यात आला आहे.
