Women Fighting Video: दररोज सोशल मीडियावर मजेदार व्हिडीओ व्हायरल होत आहेत. असे अनेक व्हिडीओ आहेत, जे पाहिल्यानंतर लोकांना हसू आवरत नाही. असे व्हिडीओ पाहिल्यानंतर लोक मोठ्याने हसायला लागतात. अलीकडे असाच एक मजेदार व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. त्यामध्ये दोन गटांमध्ये हाणामारी झाल्याचे दिसून येते; पण ही सामान्य लढाई नाही, तर लढाईबरोबरच त्यात विनोदाचा तडकाही दिसून येतो. व्हायरल व्हिडीओमध्ये दोन महिला एकमेकांना चिडविण्यासाठी भांडणाच्या मध्यभागी नाचताना दिसत आहेत. हे पाहून तुम्हीही म्हणाल की, ही लढाई आहे की नृत्य स्पर्धा!

लढाईत महिलांनी केला डान्स

व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये दोन गट समोरासमोर लढत असल्याचे दिसून येते. सहसा अशा परिस्थितीत लोक थोडे चिंताग्रस्त आणि त्रासलेले दिसतात; पण इथे गोष्ट वेगळी आहे. इथे, एका भांडणादरम्यान दोन महिला एकमेकांना नृत्याच्या चाली दाखवून एकमेकांना चिडवण्याचा प्रयत्न करीत असतांना दिसत आहेत. जणू काही त्या एखाद्या नृत्य स्पर्धेत सादरीकरण करीत आहेत. महिलांचे हावभाव आणि नृत्यशैली पाहता, असे दिसते की त्या भांडण्यापेक्षा एकमेकांना अपमानित करण्याचा प्रयत्न करताहेत. नाचणाऱ्या महिलांचे हे दृश्य इतके अनोखे आणि मजेदार आहे की, पाहणाऱ्यांनाही हसू आवरणार नाही.

येथे पाहा व्हिडीओ

हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर व्हिडीओचा कमेंट सेक्शन वापरकर्त्यांच्या कमेंट्सनी भरून गेला. लोकांनी व्हिडीओवर कमेंट्सद्वारे प्रतिक्रिया देण्यास सुरुवात केली. त्यामध्ये एका वापरकर्त्याने लिहिले, “काय चाललंय? ही मारामारी आहे की नृत्य स्पर्धा?” दुसऱ्याने म्हटले, “लढाईची एक नवीन शैली शोधली गेली आहे. आता निर्णय नृत्याद्वारे घेतला जाईल!” तिसऱ्याने लिहिले की, याला नृत्याचे युद्ध म्हटले जाईल. चौथ्या व्यक्तीने त्याला, “भांडणाचे नृत्यरूप”, असे म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा डान्स व्हिडीओ लोकांच्या हास्याचे कारण तर बनत आहेच; शिवाय जखमेवर मीठ चोळण्याची एक नवीन पद्धतही दाखवून देत आहे. हा व्हिडीओ कधीचा आणि कुठला आहे याबद्दल अचूक माहिती उपलब्ध नसली तरी तो पाहता, असे दिसते की, तो एखाद्या किरकोळ वादाचा भाग असू शकतो. हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर बिजनौरी भाई नावाच्या एका युजरने त्याच्या @bijnauriibhaaii अकाउंटवरून शेअर केला आहे, जे आतापर्यंत लाखो लोकांनी पाहिला आणि पसंत केला आहे.