scorecardresearch

World Cup 2023 : “आता काय…”, टीम इंडियाच्या पराभवानंतर चाहत्याला अश्रू अनावर; म्हणाला…

World Cup Final: टीम इंडियाच्या परभवामुळे चाहते खूपच निराश झाले. काहींना अश्रूही आवरता आले नाहीत. त्याच वेळी रोहित शर्मासह टीम इंडियाचे खेळाडूही भावूक झाले.

World Cup 2023 Final india vs australia rohit sharma cricket fans badly crying with team india lost world cup final
World Cup 2023 : टीम इंडियाच्या पराभवामुळे चाहत्याला अश्रू अनावर; म्हणाला, "आता काय…."(photo – social media)

World Cup 2023 Final : अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर रविवारी खेळल्या गेलेल्या विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात टीम इंडियाला ऑस्ट्रेलियाकडून सहा विकेट्सनी पराभव स्वीकारावा लागला. भारतीय क्रिकेट संघाने अंतिम फेरीपूर्वी संपूर्ण स्पर्धेत जबरदस्त कामगिरी केली आणि सर्व सामन्यांमध्ये नेत्रदीपक विजयाची नोंद केली होती. अशा परिस्थितीत देशाच्या करोडो क्रिकेट चाहत्यांना पूर्ण आशा होती की, यावेळी फक्त टीम इंडियाच विश्वचषक जिंकेल. पण, अंतिम सामन्यानंतर १४० कोटींहून अधिक भारतीयांचा भ्रमनिरास झाला. चाहते खूपच निराश झाले. काहींना अश्रूही आवरता आले नाहीत. त्याच वेळी रोहित शर्मासह टीम इंडियाचे खेळाडूही भावूक झाले.

उपांत्य फेरीत न्यूझीलंडच्या दारुण पराभवानंतर लोकांच्या नजरा फायनलकडे लागल्या होत्या; मात्र फायनल जिंकण्याचे भारतीयांचे स्वप्न भंगले. अशा प्रकारे एक क्रिकेट चाहता कॅमेऱ्यात रडताना दिसला. अश्रू आवरत टीम इंडियाचा चाहता ईर्शाद म्हणाला, “टीम इंडियाला भविष्यासाठी शुभेच्छा.. टीम आपली आहे. आपण आता काय बोलणार?… प्रत्येक जण आपला आहे, टीम इंडियावर नेहमी विश्वास होता आणि भविष्यातही विश्वास राहील. संघाची साथ कधीही सोडणार नाही.”पुढे तो म्हणाला, “न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिलेलाही अंतिम फेरी गाठता आली नाही, हे सर्व घडत राहते. हृदय तुटते. ऑस्ट्रेलियम संघाने चांगली कामगिरी केली; पण मन दुखावले. पुढील वर्षी टी-२० विश्वचषक होणार आहे आणि त्यातही पाठिंबा असेल.”

Shubman Gill infected with dengue
IND vs AUS: ऑस्ट्रेलियाविरुद्ध शुबमन गिल खेळणार की नाही? राहुल द्रविडने त्याच्या प्रकृतीबाबत दिली लेटेस्ट अपडेट
IND vs NED: Why did Virat Kohli suddenly leave Team India? Will the match not be played against Netherlands
IND vs NED: अनुष्काच्या प्रेग्नन्सीच्या चर्चा अन् विराट कोहली सराव सामना सोडून परतला घरी; टीम इंडियाची सोडली साथ? जाणून घ्या
Watch Viral Video of Son Welcomes Stepfather With Heartfelt Speech At Mother's Wedding snk 94
Viral Video : आईच्या लग्नामध्ये लेकाने लावली हजेरी; सावत्र वडिलांना म्हणाला, ”तुम्ही…
IND vs SL Rohit Sharma Catch Video Vira;
IND vs SL: हिटमॅनने डायव्हिंग करत एका हाताने घेतला शानदार झेल, रोहितच्या शर्माच्या कॅचचा VIDEO सोशल मीडियावर व्हायरल

Ind vs Aus Mems : “अरे, बंद कर तुझा हा टीव्ही”, टीम इंडियाच्या पराभवानंतर सोशल मीडियावर मीम्सचा महापूर

रोहित शर्मासह सर्व खेळाडू झाले भावूक

टीम इंडियाच्या पराभवानंतर संघाचा कर्णधार रोहित शर्मासह संपूर्ण टीम भावूक झाली. रोहित शर्माही भावूक झालेला दिसला. मैदानातू बाहेर पडताना त्याच्या डोळ्यांतून अश्रू वाहताना दिसले. त्याशिवाय विराट कोहली, के. एल. राहुल, मोहम्मद सिराज यांच्यासह सर्व क्रिकेटपटू निराश दिसत होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व ट्रेंडिंग बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: World cup 2023 final india vs australia rohit sharma cricket fans badly crying with team india lost world cup final sjr

First published on: 20-11-2023 at 11:30 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×