Alcohol Lover Uncle Viral Video : दारू, सिगारेटचे व्यसन आरोग्यासाठी हानिकारक आहे हे सर्वांनाच माहीत आहे. परंतु, हे जाणूनही अनेक लोक व्यसनांपासून दूर राहू शकत नाहीत. काही लोकांना सिगारेट, विडी ओढण्याचे आणि काहींना दारूचे व्यसन असते. बरेच लोक या सर्व गोष्टींचे शौकीन असतात. बऱ्याचदा असे व्यसनी लोक भररस्त्यात दारू पिऊन गोंधळ घातलाना दिसतात. तर अनेकदा ते दारूच्या नशेत असे काही कृत्य करतात की, ते पाहून आपल्यालाही आश्चर्य वाटते. सध्या सोशल मीडियावर अशाच एका आजारी काकांचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्यामध्ये ते दारूच्या नशेसाठी असे काही कृत्य करतायत की, ते पाहून तुम्हाला धक्का बसेल.

दारूसाठी एखादी व्यक्ती काय करू शकते याचा अनुभव हा व्हिडीओ पाहताना येईल. त्यात एक आजारी काका नशेसाठी आपल्या तब्येतीचाही विचार करीत नाहीत. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता की, एक आजारी काका एका ठिकाणी दगडावर बसल्याचे दिसत आहेत. बहुतेक ते आजारी असावे तम्हणून त्यांच्या नाकात एक नळी दिसतेय, जिला एक सीरिंज जोडलेली आहे; जेणेकरून ते लिक्विड फूडचे सेवन करू शकतील. यावेळी काकांच्या एका हातात एक ग्लास आहे, ज्यातून ते सीरिंजमध्ये चक्क दारू भरताना दिसत आहेत. त्या सीरिंजला जोडलेली नळी थेट काकांच्या नाकात सोडलेली आहे. त्यामुळे सीरिंजमध्ये टाकलेली दारू नाकावाटे थेट काकांच्या पोटात जाते. ते इतके आजारी असूनही काका ज्या प्रकारे दारूचे व्यसन करतायत, ते पाहून तुम्हालाही धक्का बसेल. आता हा व्हिडीओ कुठला आहे याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकलेली नाही. परंतु, अशा प्रकारे दारू कोण पितं, असे म्हणत लोक हा व्हिडीओ पाहून आश्चर्य व्यक्त करीत आहेत.

दरम्यान, हा व्हिडीओ एक्सवर @hariom5sharma नावाच्या अकाउंटवरून पोस्ट करण्यात आला आहे. व्हिडीओ पोस्ट करताना कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, ‘काका त्यांची शेवटची इच्छा पूर्ण करत आहेत.’ व्हिडीओच्या शेवटी लिहिले आहे की, ‘जीव गेला तरी चालेल; पण दारू सोडणार नाही.’ दरम्यान, युजर्सही या व्हिडीओवर वेगवेगळ्या कमेंट्स करीत आहेत. एकाने लिहिले की, देसी लोक, देसी इच्छा. दुसऱ्याने लिहिले की, खूप हुशार तेजस्वी लोक आहेत. तिसऱ्याने लिहिले की, तो एका वेगळ्याच जगात आहे. चौथ्याने लिहिले की, भावा, कशी कशी लोका असतात यार. शेवटी एकाने लिहिले की, काकांना हेच हवे आहे.