तुम्ही सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ पाहिले असतील. तसेच, अनेक डान्स व्हिडीओ बघून तुमचे चांगलेच मनोरंजनही झाले असेल. परंतु आज आपण असा एक व्हिडीओ पाहणार आहोत जो पाहून तुम्हाला नक्कीच आनंद होईल. या व्हिडीओमध्ये एक लहान मुलगी शाळेच्या गणवेशात इतका सुंदर डान्स करताना दिसत आहे की हा व्हिडीओ पाहून नेटकरी खुश झाले आहेत.

या मुलीने बॉलीवूडचा प्रसिद्ध रॅपर बादशाहच्या ‘जुगनू’ या गाण्यावर जबरदस्त डान्स केला आहे. या व्हिडीओने सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. तुम्ही सोशल मीडियावर लहान मुलांच्या डान्सचे अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण या मुलीचा डान्स जरा हटके आहे. याचा अंदाज तुम्हाला हा व्हायरल व्हिडीओ बघून येईल.

…अन् काही सेकंदात इमारत झाली जमीनदोस्त; Viral Video पाहून काळजात धस्स होईल

पोलिसांनाही ‘कच्चा बादाम’ गाण्याची क्रेझ; डान्स करतानाचा भन्नाट व्हिडीओ व्हायरल

या व्हिडीओमध्ये आपण पाहू शकतो की अनेक मुलं बादशाहच्या गाण्यावर डान्स करत आहेत, पण सर्वांचेच लक्ष याच मुलीवर खिळलेले आहे. या मुलीने सर्वांचे लक्ष आपल्याकडे आकर्षित करून घेतले आहे. तिचे डान्स मूव्ह्स खूपच आकर्षक आहेत. हा व्हिडीओ इतका भन्नाट आहे की आतापर्यंत अनेकजणांनी हा व्हिडीओ लाइक केला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा डान्स व्हिडीओ इंस्टाग्रामवर डीजे मॉन्टी नावाच्या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओ शेअर करताना युजरने कॅप्शनमध्ये लिहिले की, ‘या मुलीमधील ऊर्जा कधीच पाहिली नाही. मुलीचा हा व्हिडीओ मला आश्चर्यचकित करत आहे. व्हिडीओमध्ये आपण बघू शकतो की, ही चिमुरडी या गाण्यावर उत्तम परफॉर्मन्स देण्याचा प्रयत्न करत आहे. मुलीचे भाव इतके अप्रतिम आहेत की सगळेच तिच्याकडे आकर्षित झाले आहेत. सोशल मीडिया यूजर्स मुलीच्या डान्स मूव्हचे कौतुक करत आहेत.