scorecardresearch

पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी शेतकऱ्याने बनवले ‘अनोखे यंत्र’, video पाहून मोठे अभियंतेही होतील थक्क!

शेतकऱ्याने आपल्या शेतातून पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी हा अप्रतिम जुगाड, जे पाहून बडे अभियंतेही थक्क होतील.

desi jugad
व्हायरल व्हिडीओ (फोटो: techzexpress / Insatgram )

जगभरातील लोकांचा असा विश्वास आहे की, जुगाडच्या बाबतीत भारतातील लोकांचा हात कोणी धरू शकत नाही. भारताच्या जुगाड पद्धतीची जगात कोणीही बरोबरी करू शकत नाही. सोशल मीडियावर तुम्ही देसी जुगाडशी संबंधित अनेक व्हिडीओ पाहिले असतील, पण नुकताच असाच एक देसी हटके जुगाडचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडीओमध्ये एका शेतकऱ्याच्या देशी जुगाडने लोकांचा विचार करायला लावला आहे. शेतकऱ्याने आपल्या शेतातून पक्ष्यांना उडवून लावण्यासाठी हा अप्रतिम जुगाड, जे पाहून बडे अभियंतेही थक्क होतील.

शेतकर्‍यांची सर्वात मोठी अडचण म्हणजे पक्ष्यांपासून त्यांचे पीक वाचवणे. बहुतेक पक्षी पेरणीनंतर पिकांवर हल्ला करतात, जेणेकरून त्यांना संधी मिळताच ते धान्य खातात. अशाच समस्यांशी झगडणाऱ्या एका शेतकऱ्याला पक्ष्यांना पळवण्याचा असा मार्ग सापडला, जो पाहून तुम्हीही कौतुक केल्याशिवाय राहणार नाही. सध्या एका शेतकऱ्याच्या देशी जुगाडचा व्हिडीओ सोशल मीडियावर घबराट निर्माण करत आहे.

(हे ही वाचा: कुर्ता-पायजमामध्ये दिसला ‘देसी शक्तिमान’, सोशल मीडियावर मजेशीर Video Viral)

व्हिडीओमध्ये एका खांबामध्ये टिनचा पंखा दिसत आहे, जो वाऱ्यासोबत फिरत आहे. यासोबतच एक भांडेही बसवण्यात आले आहे, जेणेकरून वारा सुटला की नट-बोल्टच्या साहाय्याने बसवलेला पंखा फिरू लागतो आणि त्यातून भांडे वाजू लागतात. शेतकऱ्याच्या या अनोख्या यंत्रामुळे पक्ष्यांना पिकांपासून दूर ठेवता येणार आहे.

(हे ही वाचा: Video Viral:…आणि काही सेकंदात सापाने केली उंदराची शिकार)

(हे ही वाचा: मुलाने आणली इंजिनिअर सून, सासूने सांगितलं जेवण बनवायला आणि मग…; बघा हा मजेशीर Viral Video)

नेटीझन्सच्या प्रतिक्रिया

हा व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इन्स्टाग्रामवरच्या ‘techzexpress’ या अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ इंटरनेटवर खूप बघितला जात आहे आणि लाइक केला जात आहे. त्याचबरोबर व्हिडीओ पाहिल्यानंतर यूजर्स शेतकऱ्याच्या देशी जुगाडचे कौतुक करत आहेत.

मराठीतील सर्व ट्रेंडिंग ( Trending ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: You will be amazed to see unique device made by the farmer to make birds fly away ttg

ताज्या बातम्या