Funny video: सोशल मीडियावर हटके आणि भन्नाट व्हिडीओ व्हायरल होत असतात. नेटकऱ्यांचं यामुळे मनोरंजन होतं, असे व्हिडीओ तुफान व्हायरल होतात. सध्या असाच एक मनोरंजक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओत तुम्हाला दिसेल की, एक तरुण डान्स करत आहे. पण या तरुणाचा डान्स पाहून उपस्थित प्रत्येक जण चकीत झाला आहे. तुम्ही आतापर्यंत झिंगाट डान्स किंवा नागिन डान्स पाहिला असेल. पण सध्या सोशल मीडियावर या तरुणाच्या हॉरर डान्सची चर्चा आहे. हा व्हिडीओ पाहून तुम्हीही पोट धरुन हसाल. आम्ही असं का म्हणतोय, ते तुम्हाला व्हिडीओ पाहिल्यावरच कळेल.

लग्नामध्ये, वरातीमध्ये किंवा कोणत्याही कार्यक्रमातील डान्स तुम्ही पाहिलाच असेल. मात्र सध्या समोर आलेल्या तरुणाचा डान्स पाहून तुम्हाला हसू आवरणार नाही. तरुण ज्या प्रकारे डान्स करत आहे त्याची स्टाईल पाहून तुम्हीही थक्क व्हाल.

या व्हायरल व्हिडीओ तरुण जणू अचानक अंगात आल्यासारखं किंवा भूत शिरल्यासारखा नाचायला लागतो. त्याचे हात, पाय, मान अशं संपूर्ण शरीर विचित्र प्रकारच्या डान्स स्टेप मारताना तुम्हाला दिसेल. या तरुणाचा अंतरंगी डान्स पाहून बाजूला नाचणाऱ्या अनेकांची तंद्री उडाली.व्हायरल होत असलेल्या व्हिडिओ तुम्हाला सहाजण स्टेजवर डान्स करताना दिसून येतील मात्र जर व्हिडिओ नीट पाहिला तर समजेल डान्स करणारा फक्त एकच तरुण आहे. बाकी असलेले फक्त पुतले आहे जे तरुणाने सोबत भासवण्यासाठी तसं केलेले आहे. डान्स सुरु होताच तरुणाने धम्माकेदार सुरुवात केली मात्र काही वेळात सर्वत्र तरुणाने माहोळ केलेला. सर्व डान्स तरुणाने ”मला भुताने पछाडलं”या गाण्यावर डान्स केलेला आहे.

पाहा व्हिडीओ

हेही वाचा >> “कुठल्याच आईवर अशी वेळ येऊ नये…” मृत पिल्लाचा मृतदेह ओढण्याचं दुर्भाग्य नशिबी; Video पाहून डोळ्यात येईल पाणी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा व्हिडीओ _i_am_yash_08 या इन्स्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. हा व्हिडीओ गेल्या काही दिवसांत विविध सोशल मीडिया हँडल्सवरून जोरदार व्हायरल होताना दिसतोय. आता हाच व्हिडीओ काही तासांत लाखांपेक्षा अधिक नेटकऱ्यांनी पाहिलाय. दरम्यान अनेकांनी या व्हिडीओवर आपल्या मजेशीर प्रतिक्रिया देत या डान्सची फिरकी घेतली आहे.