Viral video: देशात महिलांसोबत होणाऱ्या छेडछाड, बलात्कार आणि लैंगिक अत्याचाराच्या घटना दिवसेंदिवस वाढतच आहेत.सोशल मीडियावर आपल्याला नेहमीच असे काही व्हिडीओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात, जे धक्कादायक असतात. सध्या एक असाच व्हिडीओ सोशल मीडियावर ट्रेंड होऊ लागला आहे. हल्ली मुलींना स्वसंरक्षणाचे धडे लहानपणापासून दिले जातात. प्रत्येक मुलीला आपला बचाव करता यावा म्हणून हे किती जरुरी आहे, हे दाखवणारा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.
या घटनेमध्ये काही तरुणींनी त्यांची छेड काढणाऱ्या तरुणांना चांगलाच चोप दिला आहे. ही घटना हरियाणाच्या सोनीपत येथे घडल्याची माहिती मिळाली आहे. धुलवडीच्या दिवशी काही रोड-रोमियोंनी तरुणांची छेड काढली. मात्र या तरुणांना पोरींनी चांगला सबक दिला आहे.
या व्हिडिओत तुम्ही पाहू शकता की, काही तरुणी घराबाहेर होळीचा आनंद घेताना दिसत आहेत. याच वेळी दोन तरुण त्यांच्यावर हसतात आणि काहीतरी घाणरेडी कमेंट पास करतात आणि जवळ येऊन अश्लिल स्पर्श करतात. यामुळे तरुणी रागात येऊन त्या तरुणांना मारायला लागतात. स्वत:च्या बचावासाठी तरुण देखील त्या तरुणींना मारतात. तिथून पळ काढण्याचा प्रयत्न करतात. मात्र तरुण दोन्ही तरुणांना हाणून पाडून बेदम मारतात. यावेळी तो तरुण हात जोडून माफी मागतानाही दिसत आहे. मात्र ही तरुणी त्याचं काहीही ऐकून घ्यायला तयार नाही. ती त्याला मारतच आहे. दरम्यान उपस्थित असलेल्या एकानं या घटनेचा व्हिडीओ रेकॉर्ड केला आहे. जो आता सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तरुणीची छेड काढणं एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे. तरुणीने त्यांना सर्वांसमोर चांगलीच अद्दल घडवली आहे. हा तरुण आता पुन्हा याच काय कोणत्याच मुलीच्या नादाला लागणार नाही.
पाहा व्हिडीओ
सोशल मीडियात सध्या हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे, यावर लोक वेगवेगळ्या प्रतिक्रिया देत आहे. हा व्हिडीओ parulgsclया पेवर शेअर करण्यात आला आहे. व्हिडीओला हजारोंमध्ये लाईक शेअर मिळत आहे. या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी अनेक मजेशीर प्रतिक्रिया दिल्या आहेत.