सोशल मीडियावर कधी कोणता व्हिडीओ व्हायरल होईल हे सांगता येत नाही. शिवाय व्हायरल होणाऱ्या व्हिडीओमध्ये जुगाडू व्हिडीओचा मोठ्या प्रमाणात समावेश असतो. असे अनेक व्हिडीओ आपण पाहिले आहेत, ज्यामध्ये कुणी कारला हेलिकॉप्टर बनवतो, तर कुणी विटातून कबलर बनवतो. सध्या अशाच एका तरुणाच्या जुगाडाचा अनोखा व्हिडीओ व्हायरल होत आहे, जो पाहून अनेकजण थक्क झाले आहेत. तर काहींना हसू आवरणं कठीण झालं आहे.
हो कारण एका तरुणाने उष्णतेपासून स्वत:चा बचाव करण्यासाठी एक अनोखा जुगाड केला आहे. व्हायरल होत असलेल्या या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, एक तरुण बेडवर पडला असून तो आपल्या हातातील मोबाईलमध्ये काहीतरी पाहत बसल्याचं दिसत आहे. पण यावेळी त्याने अंगावर चक्क एक मोठी प्लास्टीकची पिशवी घेतल्याचं दिसत आहे. आश्चर्याची बाब म्हणजे त्याने या पिशवीला एक पंखा जोडल्याचंही दिसत आहे. शिवाय हा पंखा सुरु करताच ती पिशवी फुगल्याचं दिसत आहे. पिशवीत जाणाऱ्या हवेमुळे तरुणाचा उष्णतेपासून बचाव होत असल्याचं दिसत आहे. मात्र काहींनी ही पिशवी हवेच्या दाबाने फाटू शकते असंही म्हटलं आहे.
या तरुणाच्या अनोख्या जुगाडाचा व्हिडिओ technical_personnel नावाच्या इंस्टाग्राम पेजवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओला आतापर्यंत २३ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत. तर अनेकांनी हा व्हिडीओ पाहिल्यानंतर वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका यूजरने लिहिले आहे, “पंखा बंद होताच त्याला थेट देवाचे दर्शन घडेल,” दुसऱ्याने लिहिलं की, हे खूप धोकादायक ठरु शकते. तर काहींनी काही वेळाने पिशवीसोबत तो उडून जाऊ शकतो असंही काहींनी कमेंटमध्ये म्हटलं आहे.