Viral Video : सोशल मीडियावर डान्सचे अनेक व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही डान्सचे व्हिडीओ मजेशीर असतात तर काही डान्सचे व्हिडीओ थक्क करणारे असतात. लहान मुलांपासून वृद्ध लोकांपर्यंत अनेक जण डान्स व्हिडीओ शेअर करत असतात. अनेक जण नवनवीन गाण्यावर डान्सचे रिल्स बनवताना दिसतात.

नुकताच प्रदर्शित झालेला शाहिद आणि क्रितीच्या ‘तेरी बातों मैं ऐसा उलझा जिया’ या चित्रपटाची अजूनही बॉक्स ऑफिसवर जोरदार चर्चा सुरू आहे. या चित्रपटातील “उलझा जिया” हे गाणं खूप लोकप्रिय झालं आहे. अनेक जण या गाण्यावर डान्स करताना दिसताहेत. सध्या असाच एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक झोमॅटो डिलिव्हरी बॉय तुफान डान्स करताना दिसतोय. सध्या हा व्हिडीओ चांगलाच चर्चेत आला आहे.

Double MA and PhD Lady Selling tea on road
MA, Ph.D ची डिग्री असूनही विकतेय रस्त्यावर चहा, महिलेनी सांगितले कारण, VIDEO Viral
A girl told the incident of how she got Rs 2 back while buying a ticket in a metro station
तिकीटातील २ रुपये परत केले नाही म्हणून तरुणीने लढवली शक्कल, पुणे मेट्रो स्टेशनवरील व्हिडीओ व्हायरल
an Old uncle and a young boy inside Delhi metro over seat issues
“रात्रभर पोलीस स्टेशनमध्ये…” तरुण अन् वृद्ध व्यक्तीमध्ये पेटला वाद, दिल्ली मेट्रोतील VIDEO होतोय व्हायरल
Electric Cycle
Doodleची इलेक्ट्रिक सायकल चालवताना दिसला एम एस धोनी, व्हिडीओ झाला व्हायरल

व्हायरल व्हिडीओ

या व्हायरल व्हिडीओमध्ये तुम्हाला एक तरुण मुलगा दिसेल ज्याने झोमॅटोचे टी शर्ट घातले आहे. तो झोमॅटो डिलिव्हरी बॉय आहे, हे त्यावरून कळते. भर रस्त्यावर तो डान्स करताना दिसतोय. सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालेले “उलझा जिया” या गाण्यावर तो सुंदर डान्स करताना दिसत आहे. त्याच्या डान्स स्टेप्स आणि चेहऱ्यावरील हावभाव पाहून तुम्हीही थक्क व्हाल. काही लोकांना डिलिव्हरी बॉयमध्ये असलेले हे डान्सचे टॅलेंट खूप आवडले. व्हिडीओ पाहून भारतात टॅलेंटची कमी नाही, असे तुम्हालाही वाटेल.

हेही वाचा : भाजी चिरण्याची निन्जा टेक्निक; मिनिटांत केले शंभरेक टोमॅटो बारीक! पाहा Video

mosaan_2o या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हा व्हिडीओ शेअर करण्यात आला असून या व्हिडीओच्या कॅप्शनमध्ये लिहिलेय, “उलझा जिया” या व्हिडीओवर अनेक युजर्सनी प्रतिक्रिया दिल्या आहेत. अनेक युजर्सनी त्याच्या डान्सवर कौतुकाचा वर्षाव केला आहे. काही युजर्सनी ‘माझा ऑर्डर कुठे आहे’असे विचारत डिलिव्हरी बॉयची खोड काढली आहेत. एका युजरने मजेशीरपणे लिहिलेय, “भावा मला ऑर्डर आलेली नाही. भूक लागली आहे” अनेक युजर्सनी हसण्याचे इमोजी शेअर केले आहेत.
या डिलिव्हरी बॉयचे नाव मोसान आहे आणि तो खूप चांगला डान्सर आहे. त्याच्या mosaan_2o या इन्स्टाग्राम अकाउंटवरून तो वेगवेगळे डान्सचे व्हिडीओ शेअर करत असतो.