Zomato Disabled Delivery Boy Video: आयुष्यात कितीही संकटे आली तरी आयुष्य जगता आलं पाहिजे. कष्ट आणि अथक परिश्रमानेच आपण यश गाठू शकतो, असं म्हणतात. जीवनात गरिबापासून श्रीमंतापर्यंत कष्ट कोणालाच चुकलेले नाहीत; फक्त त्याचे स्वरूप वेगवेगळे असू शकते. परंतु, जो तो आपापल्या परीने मेहनत घेतच असतो.

गरीब व्यक्ती पोटाची भूक भागविण्यासाठी मिळेल ते काम करीत असतात. त्यात अपंगत्व आलेलं असेल, तर आयुष्यात अनेक अडचणींना सामोरं जाण्यासाठी दुप्पट जिद्द आणि मेहनत लागते. अशा परिस्थितीत अनेक माणसं हतबल होतात, निराश होतात आणि स्वत:लाच दोष देऊ लागतात. पण, अशा परिस्थितीतही जिद्दीनं उभं राहत आपलं काम जो करतो, तोच आयुष्यात पुढे जातो. सध्या अशाच एका माणसाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय; ज्यात एक दिव्यांग डिलिव्हरी बॉय पार्सल घेऊन डिलिव्हरी करण्यासाठी बाईकवरून जात आहे.

हेही वाचा… “एवढे नखरे झेलणारी पाहिजे”, हळदीत नवऱ्याला खांद्यावर उचललं अन्…, मराठमोळ्या बायकोचा ‘हा’ VIDEO एकदा पाहाच

दिव्यांग डिलीव्हरी बॉयला सलाम

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ सध्या चर्चेत आहे. या व्हिडीओमध्ये झोमॅटोचा डिलीव्हरी बॉय पार्सल घेऊन इच्छित स्थळी जाण्यासाठी बाईकवरून आपला प्रवास करत आहे. हिमतीची गोष्ट ही की दिव्यांग असूनही जिद्द न सोडता तो आपलं काम प्रामाणिकपणे पार पाडतोय. दोन पाय नसतानादेखील काठीच्या साहाय्याने तो बाईक चालवून अथक परिश्रम करताना दिसत आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडीओ @pro_capitalmotivation07 या इन्स्टाग्राम अकाउंटवरून शेअर करण्यात आला असून “माझे नशीब खराब म्हणणाऱ्यांनी हा व्हिडीओ नक्की पाहा” अशी कॅप्शन व्हिडीओला देण्यात आली आहे. व्हिडीओ व्हायरल होताच याला २ लाखापेक्षा जास्त व्ह्यूज आले आहेत.

हेही वाचा… VIDEO: सरांचा शिकवण्याचा पॅटर्नच वेगळा! पावडर घेतली, तोंडाला लावली अन्…, मराठी शाळेतील शिक्षकाने भरवर्गात काय केलं पाहा…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्यांग डिलीव्हरी बॉयचा हा व्हिडीओ पाहून अनेकांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. एका युजरने कमेंट करत लिहिलं, “तुझ्या जिद्दीला सलाम”. तर दुसऱ्याने “या व्हिडिओ मधून कळतं की काही झालं तरी संघर्ष स्वतःला स्वतःलाच करावा लागेल आणि तोही मरेपर्यंत” अशी कमेंट केली. तर एकजण कमेंट करत म्हणाला, “किती कष्ट करतोय भाऊ”