अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला ड्ग्ज प्रकरणात अटक केल्यानंतर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपांमुळे वादात सापडलेले अमली पदार्थ नियंत्रण विभागाचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे आता नव्या संकटात सापडण्याची चिन्हे आहेत. कारण समीर वानखेडे मुस्लिम असल्याचा दावा करण्यात येत आहे. समीर वानखेडे यांचा पहिला निकाह लावणारे काझी मुजम्मिल अहमद यांनी हा दावा केला आहे.

समीर वानखेडे, त्यांचे वडील हे मुस्लिम असल्याचे काझी मुजम्मिल अहमद यांनी म्हटले आहे. समीर वानखेडे हे मुस्लिम होते. जर हिंदू असल्याचं सांगितलं असतं तर मी निकाह लावून दिलाच नसता. समीर मुसलमान होता, त्याचे वडील दाऊद मुसलमान होते, शबाना मुसलमान होती आणि तिचे वडिलही मुस्लिम होते. निकाहनामा सुद्धा बरोबर आहे. लोखंडवाला येथील एका हॉलमध्ये हा निकाल मोठ्या उत्साहात पार पडला होता, असे मुजम्मिल अहमद यांनी म्हटले आहे. त्यावर आता समीर यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने याबाबत आपलं मत व्यक्त केलं आहे.

“समीर वानखेंडेंनी अशा कोणत्याही कागदपत्रांवर सही केली नव्हती ज्यामुळे त्यांचा धर्म बदलेल. ते तेव्हाही हिंदू होते आणि आजही हिंदू आहेत. त्यांची जात ही जात प्रमाणपत्राप्रमाणे महार आहे. ज्याचे पुरावे समीर यांच्या वडिलांनी सर्वांसमोर आणले आहेत,” असे समीर यांची पत्नी आणि अभिनेत्री क्रांती रेडकरने म्हटले आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समीर वानखेडेंचे लग्न लावणाऱ्या मौलांनानी दावा केला की समीर वानखेडे आणि त्यांचे वडील मुस्लिम आहेत. त्यावर क्रांती रेडकरेन भाष्य केले आहे. “ते मौलाना भारतीय संविधानापेक्षा मोठे आहेत का? संविधानातर्फे जे प्रमाणपत्र मिळाले आहे हा भारत फक्त त्यालाच मानतो. त्यामध्ये ते हिंदू आहेत असे लिहिले आहे. नवाब मलिक जर कायदेशीर लढाई लढायला गेले तरी ते हिंदूच आहेत,” असे क्रांती रेडकर म्हणाली.