scorecardresearch

Premium

‘गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या हितासाठी केवळ काँग्रेसच’; घरगुती गॅस दरवाढीवरून राहुल गांधींचा केंद्र सरकारवर निशाणा

लाखो भारतीय कुटुंबे अत्यंत महागाई, बेरोजगारी आणि खराब प्रशासन विरुद्ध कठीण लढाई लढत असल्याचा राहुल गांधींचा टोला

rahul-gandhi-photo-pti
राहुल गांधी (पीटीआय-संग्रहीत छायाचित्र)

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी घरगुती एलपीजी गॅसच्या दरवाढीवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या कल्याणासाठी केवळ कॉंगेसच असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले आहे.

काँग्रेस गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या कल्याणासाठी काम करते

एलपीजी गॅसच्या दरवाढीवरून काँग्रेसने केंद्र सरकारवर हल्लाबोल केला आहे. मोदी सरकारच्या काळातील गॅस सिलेंडरच्या किंमतीत काँग्रेसच्या सरकारच्या काळात दोन गॅस सिलेंडर येत होते, तसेच गरीब आणि सर्वसामान्य जनतेसाठी केवळ काँग्रेस सरकारच आहे, असे ट्विट राहुल गांधी यांनी केले आहे. कारण काँग्रेस गरीब आणि मध्यमवर्गीय कुटुंबांच्या कल्याणासाठी काम करते. आमच्या आर्थिक धोरणाचा तो गाभा असल्याचे राहुल गांधी यांनी स्पष्ट केले.

घरगुती गॅसच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ

केंद्र सरकारने शनिवारी ८ मे ला एलपीजी गॅसच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ केली आहे. आंतरराष्ट्रीय ऊर्जा दरांमध्ये वाढ झाल्यानंतर अवघ्या सहा आठवड्यात गॅस दरांमध्ये झालेली ही दुसरी वाढ आहे. पूर्वी विनाअनुदानीत एलपीजी गॅसची किंमत ९४९ रुपये ५० पैसे होती. आता दरवाढीनंतर ती ९९९ रुपये ५० पैसे झाली आहे. दिंवसेंदिवस या वाढत्या महागाईवरून सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. केंद्र सरकारच्या या दरवाढीला अनेक स्तरातून विरोध करण्यात येत आहे.

लाखो भारतीय कुटुंबांची खराब प्रशासनाविरुद्ध लाढाई

लाखो भारतीय कुटुंबे अत्यंत महागाई, बेरोजगारी आणि खराब प्रशासन विरुद्ध कठीण लढाई लढत असल्याचा टोलाही राहुल गांधी यांनी मोदी सरकारला लगावला आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Only congress governs for welfare of poor middle class families rahul gandhi on lpg price hike dpj91

First published on: 09-05-2022 at 14:57 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×