‘सही’ रे सई

जसा अन्य चित्रपटांचा ‘प्रोमोज’ सुरू होतो, तसाच ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ याही चित्रपटाचा सुरू झाला. मूळ ‘नो एन्ट्री’ची ‘सही रे सही’ नक्कल करण्यात धन्यता मानल्याने त्यात वेगळे असे काय दिसणार?

जसा अन्य चित्रपटांचा ‘प्रोमोज’ सुरू होतो, तसाच ‘नो एन्ट्री पुढे धोका आहे’ याही चित्रपटाचा सुरू झाला. मूळ ‘नो एन्ट्री’ची ‘सही रे सही’ नक्कल करण्यात धन्यता मानल्याने त्यात वेगळे असे काय दिसणार? पण ‘दिसलं’ नि सुरुवातीला धस्स झाले. हळूहळू नजरेत काय ते ‘भरलंच’.. गोव्याच्या समुद्रकिनारी ‘रेड बिकिनी’त सई ताह्मणकर छान, मस्त व सहजी पावले टाकत टाकत नि समोर साक्षात कॅमेरा आहे हे विसरत पुढे येऊ लागली. आकर्षक व दिलखेचक अशी ही अदा दिसली.

‘हिप हिप हुर्ये’त स्मिता गोंदकरने सहजपणे बिकिनी रूपात दर्शन घडवले. चित्रपटाचा ‘मसाला’ फारसा न जमल्याने तिचे कष्ट वाया गेले. फॅशनेबल, फिट्ट, शॉर्ट्स अशा वस्त्रांचे बऱ्याचशा ‘मराठी तारका’ना वावगं वाटत नाही, हे काही चित्रपटांतून प्रसन्नपणे दिसते. सई तर ‘बिकिनी’त चार्मिग व ब्युटिफूल दिसलीय. सिनेमात हे दृश्य ‘फिट’ दिसू देत. प्रसंगानुसार असे काही आले तरच त्यात ‘शान’ असते. चित्रपटातील अन्य तारकांपेक्षा (क्षमेची ‘क्रांती’ असो) तूच सरस असे या साऱ्यावर थेट मत व्यक्त करीत सईला म्हटले, त्यावर ती हसली. पण मी तुमच्या मताशी सहमत आहे असे तिला म्हणायचे आहे अथवा नाही हे लक्षात येण्यापूर्वीच तिची ‘ओपन बँक रूपा’तील छबी काढण्यास व तसे सेक्सी लूक मिळविण्यात फोटोग्राफर तिच्या ‘मागे’ लागले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Sai tamhankar hot hot sai tamhankar no entry pudhe dhoka aahe no entry pudhe dhoka aahe

ताज्या बातम्या