“आम्हाला हिंदू आणि मुस्लीम…”, सप्तपदी नंतर शाल्मलीने बॉयफ्रेंड फरहानसोबत केला निकाह

शाल्मलीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

shalmali kholgade, shalmali kholgade hindu marriage and nikah, farhan shaikh,
शाल्मलीने शेअर केलेले हे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत.

बॉलिवूड गायिका शाल्मली खोलगडे ही लोकप्रिय गायिकांपैकी एक आहे. शाल्मलीने बॉयफ्रेन्ड फरहान शेखसोबत लग्न केलं आहे. शाल्मली आणि फरहान गेल्या ६ वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये होते. शाल्मली आणि फरहानने कुटुंबाच्या आणि जवळच्या मित्रांच्या उपस्थितीत लग्न केले.

या दोघांनी २२ नोव्हेंबर रोजी लग्न केले आहे. त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. सध्या त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाले आहेत. आता या दोघांनी निकाह केला आहे. त्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. याचे फोटो शाल्मलीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केले आहेत. या फोटोत शाल्मलीने निकाह केल्याचे दिसत आहे. हे फोटो शेअर करत “मला हा फोटो खूप आवडतो यावरूनच समजते की मला फरहान इतका का आवडतो.आम्हाला हिंदू आणि मुस्लीम विधीने लग्न करायचे होते. फरहानच्या मेहुण्याने आमच्यासाठी दुआ वाचल्या, निकाहचे इंग्रजी भाषांतर करण्यासाठी आणि त्यानंतर अल-फातिहाचे देखील पठन केले”, असे कॅप्शन शाल्मीलाने हा फोटो शेअर केला आहे.

आणखी वाचा : आपण एवढे श्रीमंत का आहोत? अक्षयच्या मुलाने विचारला होता प्रश्न, ट्विंकल म्हणाली…

आणखी वाचा : मलायकाच्या ‘या’ सवयीची अरबाजला येत होती चीड

शाल्मली आणि फरहान ६ वर्षे रिलेशनशिपमध्ये होते. त्यानंतर त्या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. फरहान मुंबईत मिक्सिंग आणि मास्टरींग इंजिनिअर म्हणून काम करतो. शाल्मली आणि फरहान यांनी अत्यंत गुप्त पद्धतीने लग्न केलं. तर शाल्मलीने ‘परेशान’, ‘दारू देसी’ आणि ‘बलम पिचकारी’ सारखी अनेक हिट गाणी गायली आहेत. तर शाल्मलीने ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’ या म्युझिक रिऍलिटी शोमध्ये ‘इंडियन आयडॉल ज्युनियर’ आणि ‘सूर नवा ध्यास नवा’मध्ये परीक्षकाची जबाबदारी पार पाडली.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व Uncategorized बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Singer shalmali kholgade did hindu marriage and now nikah with boyfriend farhan shaikh see pics dcp

ताज्या बातम्या