लोकसत्ता वास्तुलाभ नियम व अटी

लोकसत्ता वास्तुलाभ प्रतियोगिता २०१४ चे (यापुढे ‘प्रतियोगिता’ म्हणून संबोधित) दि इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड (‘टीआयईएल’), लोकसत्ताचे मालक व प्रकाशक, सर्वोत्तम मराठी वृत्तपत्र, यांच्याद्वारा आयोजन केले आहे.

लोकसत्ता वास्तुलाभ प्रतियोगिता २०१४ चे (यापुढे ‘प्रतियोगिता’ म्हणून संबोधित) दि इंडियन एक्स्प्रेस लिमिटेड (‘टीआयईएल’), लोकसत्ताचे मालक व प्रकाशक, सर्वोत्तम मराठी वृत्तपत्र, यांच्याद्वारा आयोजन केले आहे.
या प्रतियोगितेत भाग घेण्याकरिता तुम्हाला खालील शर्ती व अटी मान्य करावयाच्या आहेत आणि बिनशर्त स्वीकारायच्या आहेत :
१. प्रतियोगितेचे आयोजन २२ मार्च २०१४ पासून ते ५ एप्रिल २०१४ (दोन्ही दिवस धरून) करण्यात येईल.
२. प्रतियोगिता टीआयईएलचे धोरण आणि अन्य शर्तीच्या विषयाधीन असेल.
३. प्रतियोगिता वयाची १८ वर्षे पूर्ण झालेल्या व्यक्तीस खुली आहे. प्रतियोगिता भारतात राहणाऱ्या भारतीय नागरिकांनाच खुली आहे जेणेकरून त्यांच्याशी संपर्क साधू शकता येईल.
४. डेव्हलपर्स/ बिल्डर्सकडे त्यांच्या स्वत:च्या किंवा विवाहित जोडीदाराच्या नावे फ्लॅट बुक करणाऱ्या प्रतियोगींना डेव्हलपर्स/ बिल्डर्सकडे विक्रीकरिता नोंदणीकृत करारनामा करावा लागणार आहे आणि प्रतियोगितेमध्ये भाग घेण्याकरिता प्रतियोगिता प्रपत्र (कॉन्टेस्ट फॉर्म) भरावा लागणार आहे व त्यानंतर ते प्रतियोगितेमध्ये भाग घेण्यास पात्र ठरतील. प्रत्येकी एका फ्लॅटच्या खरेदीकरिता केवळ एकाच प्रवेशिकेस अनुमती देण्यात येईल. रजिस्टर डेव्हलपर्स/ बिल्डर्स आणि प्रोजेक्ट्सची यादी पाहण्यासाठी लोकसत्ता वाचा किंवा indianexpress-loksatta.go-vip.net वर पहा.
५. प्रत्येक प्रतियोगींनी डेव्हलपर्स/ बिल्डर्स सूचित कार्यालयाकडे उपलब्ध असलेले प्रपत्र भरावयाचे आहे. प्रपत्रात आवश्यक माहिती भरावी आणि १५ मे २०१४ रोजी सायं. ७.०० तत्पूर्वी संबंधित डेव्हलपर्स/ बिल्डर्सच्या सूचित कार्यालयात जमा करावे. मूळ प्रतियोगिता प्रपत्र नोंदणी आकार, स्टॅम्प ड्युटीच्या प्रदानाची पावती आणि विक्री करारनाम्याच्या प्रतीसह सादर करावे. प्रतियोगिता सहयोग प्रपत्रातील प्रश्नांची उत्तरे अचूक द्यावयाची आहेत आणि ‘घोषवाक्य’ त्यात लिहावयाचे आहे, जे स्वत:च्या कल्पकतेने निर्माण केले आहे.
६. फाटलेले, अपूर्ण प्रपत्रे, चुकीची जोडपत्रे इ. अपात्र ठरविले जातील.
७. ज्या प्रतियोगींनी अचूक माहिती आवश्यक जोडपत्रांसह प्रतियोगिता सहयोग प्रपत्रे पूर्णरीत्या भरली आहेत त्यांचाच शर्ती व अटींच्या विषयाधीन Rs. १७,४५०००/- किमतीचा जिंकत असलेल्या फ्लॅटकरिता विचार केला जाईल. प्राइज (फ्लॅट) ‘जसा आहे’ तत्त्वावर आणि कोणत्याही प्रतिनिधी, वॉरंटी किंवा आकार, गुणवत्ता, योग्यता किंवा व्यापारिता याशिवाय देण्यात येईल. टीआयईएल, तिचे संचालक, अधिकारी, कार्यकारी, कर्मचारी, प्रतिनिधी आणि/ किंवा एजण्ट्स फ्लॅटमधील उणीव/ किंवा दोष किंवा कोणत्याही प्रकारचे परिणामरूपी नुकसान, कर, पेनल्टी, दावे, मागण्या किंवा तोटा, जो काही असेल त्या स्वरूपाचा, याकरिता कोणत्याही स्वरूपात (फ्लॅट, सेवा किंवा सुविधांशी मर्यादित नाही) जबाबदार किंवा पात्र असणार नाहीत.
८. प्रतियोगिता सहयोग प्रपत्रात भरलेल्या प्रतियोगींच्या घोषवाक्याची कॉपीराइट आणि प्रज्ञात्मक मालमत्ता टीआयईएलशी अभिहस्तांकित राहील. टीआयईएल/ लोकसत्ता याचा जे काही असेल त्या कोणत्याही पद्धतीत घोषवाक्याचा वापर आणि प्रसिद्ध करण्याचा हक्क राहील. अभिहस्तांकन नित्यतेत सर्व प्रसारमाध्यमे, सर्व प्रदेश याकरिता रॉयल्टी- मुक्त असेल. टीआयईएलला त्यांना तसे वाटल्यास, निकालासह या प्रतियोगितेची जाहिरात आणि बढावा देण्यास स्वातंत्र्य राहील. विजेते सदर प्रमोशनाकरिता सहकार्य देतील, ज्याकरिता विजेत्यांनी टीआयईएलला ज्या ज्या वेळी आवश्यकता भासेल त्या वेळी मुलाखत आणि पार्श्वभूमी तपशील द्यावयाचा आहे. सहकार्य न मिळाल्यास प्राइजकरिता प्रतियोगी अपात्र ठरविला जाऊ शकतो.
९. घोषवाक्यांच्या क्रमवारीसंबंधित, टीआयईएलद्वारा निश्चित केल्यानुसार टीआयईएलद्वारा नेमणूक केलेल्या न्यायमूर्तीचा निर्णय अंतिम आणि बांधील राहील. विजेत्यासंबंधी टीआयईएलचा निर्णय अंतिम राहील.
१०. जर कळविल्याच्या तारखेपासून १५ दिवसांच्या आत विजेता प्राइज स्वीकारण्यास असमर्थ ठरल्यास, प्राइज जप्त करण्यात येईल. कोणत्याही प्रतियोगीस त्यात समाविष्ट अटी किंवा प्रतियोगी सहयोग प्रपत्र मागे घेण्यास अनुमती दिली जाणार नाही.
११. प्राइजवरील (लागू असल्याप्रमाणे) सरकारी कर, भेटवस्तू कर, व्हॅट सर्व/ कोणताही सेवाकर पूर्णत: विजेत्यांनीच सोसावयाचा आहे आणि सर्व प्रकारची वजात (टीडीएससारखे), जेथे जेथे लागू असलेली, भारतीय आयकर अधिनियम, १९६१ च्या तरतुदीच्या अनुसार टीआयईएलद्वारा केली जाईल.
१२. प्राइजचे विजेते डेव्हलपर्स/ बिल्डर्स/ सोसायटीच्या जर असल्यास, आवश्यकता समाविष्ट प्राइज घेण्यासंबंधित सर्व औपचारिकता पूर्ण करतील. विजेते त्याकरिता स्वयंसाक्षांकित फोटोकॉपीसमवेत पडताळणीकरिता पत्त्याचा पुरावा (रेशनकार्ड, पासपोर्ट, इ.) आणि पॅनकार्डसह सरकारद्वारा निर्गमित केलेले फोटो ओळखपत्रे, प्राइजची स्वीकृती याकरिता पूर्व-अटींची पूर्तता करतील. विजेते स्वयंसाक्षांकित फोटोकॉपीसमवेत पडताळणीकरिता नोंदणी पावती आणि मूळ विक्री करारनामासुद्धा सादर करतील.
१३. प्राइज अहस्तांतरणीय, अदलाबदल न करता येण्याजोगे आणि ना-परतावा आहे. प्राइजच्या ऐवजी रोख रक्कम दिली जाणार नाही. प्राइज विजेत्याद्वाराच केवळ गोळा करावे लागणार आहे.
१४. प्रत्येक प्रतियोगी आणि विजेता कोणतीही आवश्यक माहिती गुप्त ठेवणार नाही किंवा विपर्यास करणार नाही. कोणत्याही क्षणी सदर बाब लक्षात आल्यास प्रतियोगीस/ विजेत्यास प्रतियोगितेमधून अपात्र ठरविले जाईल. प्रत्येक प्रतियोगी या प्रतियोगितेमध्ये त्यांच्या सहभागातून उद्भवणारा दावा किंवा कोणतेही वाद प्रकरण आणि/ किंवा या शर्ती आणि अटींच्या कोणत्याही बिगर अनुपालनार्थच्या अनुसार टीआयईएल, तिचे संचालक, कर्मचारी, कार्यकारी, प्रतिनिधी आणि एजण्टस यांचा बचाव करील आणि बचावात्मक पवित्रा घेतील व निरपराध राहील.
१५. सहभागी त्यांच्या कृतींमुळे उद्भवणाऱ्या प्रतियोगितेसंबंधित प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे मालमत्तेचे नुकसान किंवा कोणतीही दुखापतअंतर्भूत कोणत्याही स्वरूपाचा तोटा व दायित्व, मागण्या, कोणतेही सध्याचे किंवा भविष्यातील दाव्यांपासून, ही प्रतियोगिता सुरू करण्यात सहभागी असलेले बीसीसीएल, तिचे कर्मचारी, प्रतिनिधी, नामनिर्देशित व्यक्ती, सल्लागार आणि एजण्ट्स यांचा बचाव करतील, तसेच त्यांना कोणतीही इजा पोहोचविणार नाहीत व त्यांचे संरक्षण करतील.
१६. प्रतियोगितेत भाग घेणाऱ्या सहयोगींना शर्ती व अटी मान्य आहेत, असे ग्राह्य धरले जाईल.
१७. प्रतियोगितेत स्वेच्छेने भाग घेता येईल आणि डेव्हलपर्सकडील आयटम्स/ प्रॉडक्ट्स/ सर्व्हिसेस प्रतियोगितेत भाग न घेतासुद्धा उपलब्ध असतील.
१८. विजेते प्रत्यक्ष उपस्थित राहून त्यांची बक्षिसे गोळा करतील, तसेच विक्री करारनाम्याची मूळ/ फोटोकॉपी, स्टँप ड्युटी व नोंदणी आकाराच्या प्रदानाची पावती, मूळ रूपातील ’लकी ड्रॉ’ दुसरी प्रत, पॅन कार्डची फोटोकॉपी आणि नेमणूक केलेल्या ठिकाणांच्या पत्त्याचा दाखला इ. सादर करतील.
१९. सर्व वाद मुंबई येथील न्यायालयाच्या एकमेव अधिकारितेच्या विषयाधीन राहतील.
२०. टीआयईएल कोणतीही सूचना न देता त्यासंबंधित नियम, शर्ती व अटी आणि/ किंवा प्रतियोगिता स्थगित करणे, रद्द करणे किंवा सुधारणे, त्यात भर घालणे किंवा खंडित करणे याकरिता त्यांचा अधिकार राखून ठेवीत आहेत. टीआयईएल प्रतियोगितेमधून डेव्हलपर्स/ बिल्डर्स/ प्रोजेक्ट्स यात भर घालणे, काढून टाकणे आणि त्यात सुधारणा करण्याचा हक्कसुद्धा राखून ठेवीत आहेत. टीआयईएल अशा परिमाणांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरीत्या जबाबदार किंवा पात्र असणार नाहीत. टीआयईएल कोणत्याही आदेश सूचनेकरिता मर्यादित नसलेल्या कोणत्याही अनपेक्षित घटना किंवा कोणत्याही न्यायालयाचा किंवा सांविधिक संस्थेचा सल्ला, जो जे काही असेल त्या कोणत्याही कारणास्तव, प्रतियोगितेच्या आयोजनास किंवा निष्कर्षांस प्रतिबंध करतो, याकरिता जबाबदार असणार नाही. हे प्राइज कायदे, नियम आणि प्रचलित आदेशांच्या विषयाधीन आहेत.
२१. कोणत्याही विधी प्रकरणाकरिता या शर्ती व अटींचे स्पष्टीकरण केवळ इंग्रजी भाषेतीलच विचारात घेतले जाईल. यात समाविष्ट शर्ती आणि अटींचे काटेकोरपणे पालन होण्याकरिता टीआयईएलच्या उद्देशाने किंवा त्याशिवाय असमर्थतेविषयी कोणत्याही अटींमध्ये फेरबदल करता येणार नाही किंवा मान्य केले जाणार नाही किंवा सदर असमर्थता किंवा निवडणूक सदर हक्क किंवा बंधनांचा परित्याग केल्याचे मानले जाणार नाही.
२२. कोणताही टीआयईएलचा कर्मचारी किंवा डेव्हलपर्स/ बिल्डर्स किंवा त्यांचे संबंधित कुटुंब या प्रतियोगितेमध्ये भाग घेऊ शकणार नाही.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Loksatta vastulabh terms and conditions

ताज्या बातम्या