मित्रांनो, संघ लोकसेवा आयोगाच्या व एमपीएससीच्या पूर्वपरीक्षेमध्ये डेटा इंटरप्रिटेशन हा स्वतंत्र उपघटक नमूद करण्यात आला आहे. या उपघटकात आलेख आणि तक्त्याच्या स्वरूपात माहिती दिलेली असते. त्यावरून प्रश्नांची उत्तरे देणे अपेक्षित असते. या घटकाचा अभ्यास करण्यासाठी अधिकाधिक प्रश्न सोडवून पाहावेत. या घटकावर आधारित एखादा प्रश्न सोडवताना जर अधिक वेळ मोडत असेल तर त्या प्रश्नात वेळ न दवडता पुढील प्रश्न सोडविण्याचा प्रयत्न करावा.
खालील स्तंभलेखाचा अभ्यास करून प्रश्नांची उत्तरे द्या.

सेल्युलर फोनची विक्री
13-tab01

* १९९७ आणि १९९८ या वर्षांतील सेल्युलर फोनच्या विक्रीतील फरक सांगा.
१) ५०० युनिट २) १,००० युनिट
३) ५,००० युनिट ४) १८,००० युनिट

स्पष्टीकरण प्रश्न- १
१९९७ साली झालेली विक्री = ४८,०००
१९९९ साली झालेली विक्री = ३०,०००
फरक = ४८,०००-३०,००० = १८,०००
उत्तराचा पर्याय = ४
* २००१ ते २००२ या काळात सेल्युलर फोनच्या विक्रीत झालेली शेकडा वाढ किती ?
१) ११५% २) १२८% ३) १२२% ४) ११८%
स्पष्टीकरण- २००१ ते २००२ या काळात सेल्युलर फोनच्या विक्रीत झालेली शेकडा वाढ

४०,००० – १८,०००
—————-   x १०० = १२२%
१८,०००

उत्तराचा पर्याय = ३

१९९९ आणि २००१ या कालावधीत एकूण सेल्युलर फोनची विक्री खालीलपकी कोणत्या वर्षांच्या \विक्रीसमान आहे?
१) १९९७ २) १९९८ ३) २००० ४) २००२

स्पष्टीकरण- १९९९ आणि २००१ या काळात एकूण सेल्युलर फोनची विक्री =
३०,००० + १८,००० = ४८,०००.
म्हणून उत्तराचा पर्याय १.
* खालीलपकी कोणत्या दोन वर्षांतील सेल्युलर फोन विक्रीतील शेकडा फरक सर्वात कमी आहे?
१) १९९७ आणि १९९८ ३) पर्याय १ व २
२) १९९९ आणि २००० ४) २००१ व २००२
स्पष्टीकरण- सर्वप्रथम पर्यायानुसार प्रश्न सोडवणे सोपे असेल म्हणून १९९७ आणि १९९८ या काळातील

शेकडा वाढ =        ४८,००० – ४०,०००
——————   = x १०० = २०%
४०,०००

१९९९ आणि २००० या कालावधीतील

शेकडा वाढ    ३०,०००- २५,०००
–      ——————–   = x १०० = २१%
२५,०००

म्हणून पर्याय ३.
स्पष्टीकरण– दोन्ही १९९७-१९९८ आणि १९९९-२०००

प्रश्न २ :
खालील स्तंभलेखात १९९२ ते १९९७ या काळात भारतात झालेली परकीय गुंतवणूक दर्शवलेली आहे. ती अभ्यासून प्रश्नांची उत्तरे द्या.
भारतातील परकीय गुंतवणूकीचे प्रवाह
tab03

* १९९७ ते १९९२ या काळातील परकीय गुंतवणुकीचा विचार करता (१९९७ : १९९२) हे प्रमाण कसे असेल?
१) ५.५० : १ २) ५.३६ : १
३) ५.६४ : १ ४) ५.७५ : १
स्पष्टीकरण : आकृतीवरून १९९७ सालची गुंतवणूक = ३१.३६
आकृतीवरून १९९२ सालची गुंतवणूक = ५.७
tab02
म्हणून पर्याय क्रमांक १

(पुढील प्रश्न उद्याच्या अंकात..)
लेखन : डॉ. जी. आर. पाटील