उत्तम मिळकत प्राप्त होणाऱ्या संपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रासंबंधीच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती-
वेल्थ मॅनेजमेंट या क्षेत्रात करिअरच्या उत्तमोत्तम संधी उपलब्ध आहेत. गुंतवणुकीचे विविध पर्याय उत्तमरीत्या समजावून सांगण्याची सेवा वेल्थ मॅनेजर, फायनान्शिअल प्लानर देऊ शकतात. इतरांच्या पशाचे नियोजन करण्याच्या या शास्त्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांना उत्तम मानधन मिळते.
या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्या व्यक्तीने चांगल्या संस्थेतून प्रशिक्षण घेणे जसे आवश्यक आहे, त्याचबरोबर यात अनुभवसुद्धा खूप महत्त्वाचा ठरतो. ही बाब सातत्यपूर्ण अभ्यासानेच साध्य होऊ शकते. वेल्थ मॅनेजमेंटच्या दृष्टीने विविध उत्पादने- विमा योजना, म्युच्युअल फंड्स, बँकांतील गुंतवणूक, सोने-चांदी आणि इतर मौल्यवान धातूंतील गुंतवणूक, कला क्षेत्रातील गुंतवणूक, परदेशी मार्केटमधील गुंतवणूक आदींचा अचूक अभ्यास असणे आवश्यक ठरते. ग्राहकांच्या गरजा ओळखून या सर्व सेवा उत्पादनांची उपयुक्तता निश्चित करण्याचे ज्ञान अशा अभ्यासातूनच मिळते.
या क्षेत्रात करिअर करू इच्छिणाऱ्यांचा दृष्टिकोन हा स्वत:च्या लाभापुरता मर्यादित न ठेवता ग्राहकांच्या परिपूर्ण हिताचा असणे गरजेचे आहे. संपत्तीत वृद्धी आणि चलनवाढीला समर्थपणे तोंड देत सध्याची जीवनशैली पुढेही कायम ठेवण्यासाठी या संपत्तीचा उपयोग कसा होईल याचे सुव्यवस्थित मार्ग ग्राहकांना दाखवणे हे संपत्ती व्यवस्थापकाचे कौशल्य ठरते. यासाठी बाजारव्यवस्थेतील चढ-उतार, या चढ-उतारांवर होणाऱ्या विविध घटकांचा परिणाम, जागतिक घडामोडींचे होणारे परिणाम, नवे प्रवाह, शासकीय पातळीवरील अर्थविषयक धोरणांचा बाजारावर होणारा परिणाम याचे ज्ञान संपत्ती व्यवस्थापकाला असणे आवश्यक ठरते. उत्तम संवाद कौशल्य तसेच सादरीकरणाचे कौशल्यसुद्धा महत्त्वाचे ठरते.
करिअर संधी
या क्षेत्रातील प्रशिक्षित उमेदवारांना मोठय़ा बँका, ब्रोकरेज हाऊसेस, संपत्ती व्यवस्थापन कंपन्या, विमा कंपन्या, सनदी लेखापालांच्या कंपन्या यामध्ये संधी मिळू शकते. शिवाय ग्राहकांना व्यक्तिगत सल्ला-सेवा दिल्या जाऊ शकतात. ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धीच्या अनेक शक्यता आणि संधी दडलेल्या आहेत. त्यामुळे या क्षेत्रातही संपत्ती व्यवस्थापकांना करिअर संधी उपलब्ध होऊ शकतात.
अर्हता : या क्षेत्रात करिअर करूइच्छिणारा उमेदवार हा कोणत्याही क्षेत्रातील पदवीधर असावा. या उमेदवाराने चार्टर्ड फायनान्शिअल अॅनालिस्ट हा अभ्यासक्रम केल्यास उत्तम. अभ्यासक्रम करताना एखाद्या वित्तीय नियोजन संस्थांमध्ये उमेदवारी केल्यास अनुभव आणि कार्यात्मक ज्ञानामध्ये वाढ होऊ शकते. वित्तीय ज्ञानासोबतच व्यवस्थापकीय कौशल्य प्राप्त करून घेण्यासाठी एमबीए किंवा पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन मॅनेजमेंट अभ्यासक्रम केल्यास अधिक चांगल्या संधी मिळू शकतात. दर्जेदार संस्थेतील पदवी, एमबीए आणि अनुभव या बाबींच्या आधारावर या क्षेत्रातील मानधन अथवा वेतन अवलंबून असते. खासगी क्षेत्रातील वित्तीय संस्थांमधील संपत्ती व्यवस्थापक वार्षिक १५ लाखांपर्यंतचे वेतन मिळवू शकतात. राष्ट्रीय बँकांमध्ये अशा व्यावसायिकांना वार्षिक ८ -९ लाख वेतन मिळू शकते. बहुराष्ट्रीय कंपन्यांत अशा उमेदवारांना १२ ते १५ लाख रुपयांपर्यंत वेतन मिळू शकते.
अभ्यासक्रम उपलब्ध असलेल्या संस्था
० आयसीआयसीआय डायरेक्ट सेंटर फॉर फायनांशिएल लìनग : अभ्यासक्रम पुढीलप्रमाणे-
* फाऊंडेशन प्रोग्रॅम फॉर स्टॉक इन्व्हेस्टिंग
* बिगिनर्स प्रोग्रॅम ऑन फ्युचर अॅण्ड ऑप्शन्स
* टेक्निकल अॅनालिसिस
* अॅडव्हान्स्ड डेरिव्हेटिव्हज ट्रेडिंग स्ट्रॅटेजी
* मार्केट मास्टर
* पर्सनल फायनान्शिएल प्लानिंग
* फास्ट ट्रॅक फाऊंडेशन प्रोग्रॅम ऑन स्टॉक इन्व्हेस्टिंग
* फास्ट ट्रॅक फाऊंडेशन प्रोग्रॅम ऑन फ्युचर अॅण्ड ऑप्शन्स.
हे अभ्यासक्रम शेअर बाजारामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त ठरू शकतात. संपर्क- श्री सावन नॉलेज पार्क, प्लॉट नंबर- डी- ५०७, टीटीसी इन्डस्ट्रिअल एरिया, एमआयडीसी, तुभ्रे, नवी मुंबई-४००७०५.
वेबसाइट- content.icicidirect.com
ई-मेल- learning@icicisecurities.com
० बीएसई इन्स्टिटय़ूट– या संस्थेने स्टॉक मार्केटशी संबंधित विविध विषयांवर विविध कालावधीचे अभ्यासक्रम सुरू केले आहेत. हे अभ्यासक्रम गुंतवणकदारांसोबतच उद्योजक, व्यावसायिकांना उपयुक्त ठरू शकतात. या अभ्यासक्रमांमध्ये आíथक व गुंतवणुकीचा सल्ला, मार्गदर्शन, स्टॉक मार्केटमधील चढ-उतारांचे विश्लेषण यासारख्या विषयांचा समावेश आहे.
* पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन स्टॉक मार्केट्स हा अभ्यासक्रम सुरूकेला आहे. कालावधी- एक वर्ष. अर्हता- कोणत्याही विषयातील पदवी.
* ग्लोबल फायनांशिअल मार्केट्स प्रोफेशनल. अर्हता- कोणत्याही शाखेतील बारावी उत्तीर्ण.
० इतर अभ्यासक्रम
* बेसिक कोर्स ऑन स्टॉक मार्केट
* फायनान्शिएल मॉडेिलग
* रिस्क मॅनेजमेंट अॅण्ड सिक्युरिटीज सेटलमेंट
* अप्लिकेशन ऑफ बिव्हेरिएल फायनान्स इन इव्हेिस्टग
* फंडामेंटल अॅनालिसिस
* व्हॅल्यूएशन अॅण्ड मॉडेिलग फॉर बँकिंग सेक्टर
* अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम ऑन डेरिव्हेटिव्हज
* अॅडव्हान्स्ड प्रोग्रॅम ऑन स्टॉक मार्केट
* सर्टििफकेट प्रोग्रॅम ऑन कमॉडिटी अॅण्ड करन्सी मार्केट
* सर्टििफकेट प्रोग्रॅम ऑन कॅपिटल मार्केट
* अकौंटिंग ऑफ फायनान्शिएल इंस्ट्रमेंटस् अॅण्ड डेरिव्हिटिव्हज्
* इक्विटी पोर्टफोलिओ स्ट्रक्चर अॅण्ड स्टॉक अॅनालिसिस
* सर्टििफकेट प्रोग्रॅम इन करन्सी मार्केट
* बेसिक प्रोग्रॅम ऑन डेरिव्हेटिव्हज्. कोणत्याही विद्याशाखेतील पदवीप्राप्त व्यक्तीला हे अभ्यासक्रम करता येतात.
संपर्क- बीएसई इन्स्टिटय़ूट लिमिटेड १८-१९ वा मजला,
पी.जे. टॉवर्स, दलाल स्ट्रीट, मुंबई- ४००००१.
ई-मेल-admissions@bseindia.com, training@bseindia.com वेबसाइट- gfmp.bsebti.com
० इन्स्टिटय़ूट ऑफ इन्शुरन्स अॅण्ड मॅनेजमेंट- या संस्थेंतर्गत कार्यरत असणाऱ्या इंटरनॅशनल स्कूल ऑफ अॅक्चुरिएल सायन्स या संस्थेने द पोस्ट ग्रॅज्युएट डिप्लोमा इन अॅक्चुरिएल सायन्स हा दीड वष्रे कालावधीचा अभ्यासक्रम सुरू केला आहे. हा विषय विमा गुंतवणूक आणि निवृत्त वेतन नियोजनाशी संबंधित आहे.
पत्ता- प्लॉट नंबर ३८/३९, एपीएसएफसी बिल्डिंग, तळमजला, फायनान्शिएल डिस्ट्रिक्ट, नानकरामगुडा व्हिलेज, गाचीबाऊली, हैदराबाद- ५०००३२ वेबसाइट- http://www.iirmworld.org.in ई-मेल-email@iirmworld.org.in
० डी.एस. अॅक्चुरिएल एज्युकेशन सर्व्हिसेस-
– बीएस्सी इन अॅक्चुरिएल सायन्स. अर्हता- कोणत्याही विषयातील बारावी. कालावधी तीन वर्षे.
– एम.एस्सी. इन अॅक्चुरिएल सायन्स. अर्हता- बीएस्सी इन अॅक्चुरिएल सायन्स. कालावधी दोन वर्षे.
या अभ्यासक्रमामध्ये जीवन विमा, आरोग्य विमा, सर्वसाधारण विमा, संपत्तीचे मूल्यांकन, धोक्यांचे विश्लेषण, रिस्क मॅनेजमेंट, प्रायसिंग ऑफ सेक्युरिटीज आणि डेरिव्हेटिव्हज या विषयांचा समावेश करण्यात आला आहे. पत्ता- डी.एस. अॅक्चुरिएल एज्युकेशन सर्व्हिसेस अॅण्ड द जुहू पाल्रे एज्युकेशन सोसायटी, उत्पल संघवी स्कूल. पूर्व- पश्चिम रोड, जेव्हीपीडी स्कीम, मुंबई.
वेबसाइट- http://www.dsacted.com
० वेलिंगकर इन्स्टिटय़ूटच्या अंतर्गत येणाऱ्या ‘वुई स्कूल’ या संस्थेने डिप्लोमा इन कमोडिटिज मार्केट हा अभ्यासक्रम सुरू केला आहे. पत्ता- वेलिंगकर्स इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट डेव्हलपमेंट अॅण्ड रिसर्च, माटुंगा (सेंट्रल रेल्वे),
मुंबई- ४०००१९. वेबसाइट- http://www.wellingkar.org
ई-मेल- admissions@welingkar.org
संग्रहित लेख, दिनांक 16th May 2014 रोजी प्रकाशित
संपत्ती व्यवस्थापन
उत्तम मिळकत प्राप्त होणाऱ्या संपत्ती व्यवस्थापन या क्षेत्रासंबंधीच्या विविध अभ्यासक्रमांची माहिती-

First published on: 16-05-2014 at 01:01 IST
मराठीतील सर्व way to success बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Wealth management