अतिवृष्टीमुळे विरार पश्चिमेच्या एमबी इस्टेट परिसरातील स्वस्तिक या इमारतीचा स्लॅबचा काही भाग कोसळल्याची घटना घडली आहे. गुरुवारी दुपारी १२ च्या सुमारास ही घटना घडली. यात ३ जणांची अग्निशमन दलाच्या जवानांनी सुटका केली आहे.

वसई विरार शहरात पावसाने चांगलाच जोर धरला आहे. यामुळे विविध ठिकाणी पाणी साचल्याने नागरिकांचे हाल झाले आहेत. काही ठिकाणी झाडे कोसळणे, नागरिक अडकून पडणे अशा घटना समोर येत आहेत. नुकताच भाईंदर येथे इमारतीचा स्लॅब कोसळल्याची घटना ताजी असतानाच विरार पश्चिमेच्या परिसरात एमबी इस्टेट परिसर आहे. या भागात असलेल्या स्वस्तिक इमारतीच्या स्लॅबचा काही भाग पावसामुळे कोसळला.

हेही वाचा – महामार्ग, वर्सोवा पुलावर खड्डय़ांची समस्या कायम; ठेकेदारावर अद्याप गुन्हा दाखल नाही

हेही वाचा – वसई : सनसिटी येथे बस बंद पडल्याने प्रवासी अडकले, अग्निशमन दलाकडून २० ते २५ प्रवाशांची सुखरूप सुटका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या घटनेची वसई विरार महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या जवानांना माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेत पहिल्या व दुसऱ्या माळावर अडकलेल्या ३ नागरिकांची सुखरूप सुटका केली आहे. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसून जीर्ण झालेल्या इमारतीच्या स्लॅबचा काही भाग कोसळला आहे.