भाईंदर : मीरा रोडच्या काशिमिरा परिसरातील एका बेकरीत गोळीबार करण्याचा प्रयत्न ऐनवेळी बंदुक लॉक झाल्याने फसला. शुक्रवारी सकाळी ही घटना घडली.

मीरा रोडच्या काशिमिरा येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यासमोर इंटरनॅशनल नावाची बेकरी आहे. सकाळी दहाच्या सुमारास डोक्याला हेल्मेट लावून एका व्यक्तीने प्रवेश केला होता. यावेळी दुकानात असलेल्या व्यवस्थापक आणि दोन कर्मचाऱ्यांना धमाकावत त्याने थेट बंदूक काढली. त्याने गोळीबार करण्याचा प्रयत्न केला. मात्र बंदुकीचे ऐनवेळी ‘ट्रिगर’ लॉक झाल्यामुळे गोळी चालू शकत नव्हती. प्रयत्न फसल्याने त्याने तिथून पळ काढला. हा व्यक्ती कोण होता तो नेमका का आला ते अद्याप स्पष्ट झालेले नाही. काशिमिरा पोलीस या व्यक्तीचा शोध घेत आहेत. बेकरी लुटण्यासाठी तो आला असण्याची शक्यता आहे.

हेही वाचा – सावधान! नायजेरियन भामट्यांची फसवणुकीची नवीन पद्धत, विवाहविषयक संकेतस्थळांवर भारतीय बनून मुलींची फसवणूक

हेही वाचा – जामीन मिळालेल्या ‘हिंदू गोवंश रक्षा समिती’च्या कार्यकर्त्याचे नालासोपाऱ्यात जंगी स्वागत, बॉम्बहल्ल्याचे नियोजन केल्याचा होता आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ही व्यक्ती बेकरीत शिरून व्यवस्थापकाच्या दिशेने बंदूक उगारली होती. मात्री ती बंद पडल्याने तो निघून गेला. हे सर्व सीसीटीव्ही कॅमेर्‍यातून समोर आल्याची माहिती पोलीस उपायुक्त (परिमंडळ १) जयंत बजबळे यांनी दिली. ज्या ठिकाणी ही घटना घडली तेथे समोरच काशिमिरा पोलीस ठाणे आहे.