वसई: बँक दरोडयातील फरार आरोपी अनिल दुबे अखेर अटकेत|anil dube the absconding accused in the bank robbery is finally arrested | Loksatta

वसई: बँक दरोडयातील फरार आरोपी अनिल दुबे अखेर अटकेत

मागील वर्षी जुलै महिन्यात विरारच्या आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. याच बँकेचा माजी व्यवस्थापक असलेल्या अनिल दुर्बे यांने बँकेत दरोडा घालून तीन कोटी रुपयांची लूट केली होती .

वसई: बँक दरोडयातील फरार आरोपी अनिल दुबे अखेर अटकेत
वसई: बँक दरोडयातील फरार आरोपी अनिल दुबे अखेर अटकेत

पोलिसांच्या तावडीतून फरार झालेला बँक दरोडा आणि हत्या प्रकरणातील आरोपी अनिल दुबे याला गुन्हे शाखा ३ च्या पथकाने वसईतून अटक केली आहे. शुक्रवारी दुपारी त्याला वसई न्यायालयात आणले असताना पोलिसांना गुंगारा देऊज तो पळून गेला होता. दुबे याला पळून जाण्यास मदत करणाऱ्या चांद मेहबूब खान या आरोपीला देखील अटक करण्यात आली आहे.

मागील वर्षी जुलै महिन्यात विरारच्या आयसीआयसीआय बँकेवर दरोडा पडला होता. याच बँकेचा माजी व्यवस्थापक असलेल्या अनिल दुर्बे यांने बँकेत दरोडा घालून तीन कोटी रुपयांची लूट केली होती यावेळी त्याने केलेल्या हल्ल्यात बँकेच्या महिला व्यवस्थापक योगिता वर्तक-चौधरी यांचा मृत्यू झाला होता तर श्रद्धा देवरुखकर या जखमी झाल्या होत्या… तेव्हापासून तो न्यायालयीन कोठडीत होता. शुक्रवारी दुपारी त्याला वसई न्यायालयात आणले असताना पोलिसांना चकमा देऊन तो पळून गेला होता. या प्रकरणाचा तपास करून गुन्हे शाखा तीनच्या पथकाचे प्रमुख प्रमोद बडाख यांनी त्याला वसईतुन अटक केली आहे तर त्याचा साथीदार चांद खान याला नालासोपाऱ्यातून अटक केली आहे

मराठीतील सर्व वसई विरार ( Vasaivirar ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 28-11-2022 at 13:25 IST
Next Story
वादाच्या भोवऱ्यात ‘हिंदी भाषिक भवना’चे भूमिपूजन संपन्न; विरोध करणारे मराठी एकीकरण समितीचे १२ कार्यकर्ते ताब्यात