वसई– पालघऱ लोकसभा मतदारसंघात अद्याप कुठल्याही पक्षाने उमेदवारी जाहीर केली नसताना बहुजन महापार्टी या पक्षाने सुकूर घाटाळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. पालघर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जातीसाठी राखीव मतदार संघ आहे. या मतदार संघावर वर्चस्व मिळविण्यासाठी विविध पक्षांमध्ये चढाओढ लागली आहे.मात्र अद्याप कुणीही उमेदवार जाहीर केलेला नाही.
हेही वाचा >>> वसई: महामार्गावर अंगाडियाची गाडी अडवून ५ कोटींची लूट; नकली पोलीस बनून रचली योजना
बुधवारी बहुजन महापार्टी पक्षाने परेश घाटाळ यांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यांना पक्षाने एबी फॉर्म दिला आहे. आम्ही पक्षातर्फे महाराष्ट्रात १५ तर देशात एकूण ५० जागा लढविणार आहोत असे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव शमशुद्दीन खान यांनी सांगितले. पालघरच्या जागेवरून इतर पक्षात रस्सीखेच विद्यमान खासदार राजेंद्र गावित हे शिंदे गटात असून शिंदे गटाने ही जागा मागितली आहे. तर पालघर मतदार संघावर पूर्वी भाजपाचा खासदार असल्याने भाजपाने हा मतदारसंघ मागितला आहे. त्यामुळे अद्याप महायुतीचा उमेदवार जाहीर झाला नाही. महाविकास आघाडी देखील उमेदवारांची चाचपणी करत आहे. बहुजन विकास आघाडीने निवडणूक लढविण्याची घोषणा केली असली तरी अद्याप उमेदवार जाहीर केलेला नाही.