बारमध्ये विद्युत दरवाजा असलेली गुप्त खोली

वसई : मीरा रोड येथील गंधर्व बार शुक्रवारी पालिकेच्या अतिक्रमणविरोधी पथकाने जमीनदोस्त केला. या बारमध्ये बारबाला लपविण्यासाठी अनधिकृत बांधकाम करून गुप्त खोल्या तयार केल्याचे आढळून आले.

मीरा रोड आणि भाईंदर शहरात असलेल्या बारमध्ये छुप्या पद्धतीने डान्स बार सुरू असतात. गुरुवारी रात्री गुन्हे शाखा १ च्या पथकाने कारवाई करून मीरा रोड येथील गंधर्व बारवर कारवाई केली होती. यावेळी २५ बारबाला आणि ग्राहक अश्लील कृत्य करताना आढळले होते. यानंतर शुक्रवारी पालिकेने या बारवर कारवाई करून बार जमीनदोस्त केला. या बारमध्ये गुप्त खोल्या तयार करण्यात आल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक हितेंद्र विचारे यांनी दिली. यानंतर शुक्रवारी पालिकेने कारवाई करून बार जमीनदोस्त केला.

विद्युत दरवाजा असलेली गुप्त खोली

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेष म्हणजे या बारमध्ये विद्युत दरवाजा तयार करून गुप्त खोली तयार करण्यात आली होती. बारविरोधात आमची कारवाई सुरूच राहणार आहे, अशी माहिती उपायुक्त मारुती गायकवाड यांनी दिली.