वसई: वडिलांचे मद्यपानाच्या सवयीमुळे नालासोपार्‍यात राहणाऱ्या ३ अल्पवयीन बहिणींच्या आयुष्याची शोकांतिका झाल्याचा प्रकार समोर आले आहे. या मुलींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेत मागील एक वर्षांपासून वेगवेगळे आरोपी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार करत होते. याप्रकरणी एकूण ४ आरोपींना अटक करण्यात आली आहे. यातील एक आरोपी हा सराईत गुन्हेगार आहे.

नालासोपार्‍यात राहणाऱ्या ३ अल्पवयीन मुलींच्या बाबतीत ही शोकांतिका घडली आहे. मुलींच्या वडिलांना दारूचे व्यसन होते आणि ते पत्नीला मारहाण करत होते. त्यामुळे पत्नी सोडून गेली होती. मुलींना देखील त्यांचे वडील मारहाण करत होते. त्यामुळे मागील वर्षी १७ वर्षांची मुलगी घरातून निघून गेली होती. याच काळात दत्ता क्षीरसारगर (३५) या आरोपीने तिच्या असहाय्यतेचा फायदा घेऊन तिला आसरा दिला आणि तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. तिला भेटण्यासाठी तिच्या दोन लहान बहिणी देखील तिच्याकडे येत होत्या. या काळात आरोपी क्षीरसागर याने एका बहिणीवर बलात्कार केला. त्याचे दोन साथीदार निशाद खान (१९) आणि सय्यद अशा दोन अन्य आरोपींनी देखील या मुलींवर लैंगिक अत्याचार केले. मागील वर्षापासून हा प्रकार सुरू होता. यामुळे एक मुलगी गर्भवती देखील राहिली होती.

हेही वाचा : जीवघेणी स्पर्धा आणि तणाव विद्यार्थ्यांच्या जिवावर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यातील दत्ता क्षीरसागर हा सराईत आरोपी असून त्याच्यावर राज्यभरातील विविध पोलीस ठाण्यात सुमारे ४०० गुन्ह्यांची नोंद आहे. आम्ही या प्रकरणात ४ आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे, अशी माहिती पेल्हार पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र वनकोटी यांनी दिली.