भाईंदर :- मिरा रोड मध्ये एका घरात झालेल्या सिलेंडरच्या स्फोटात एक जण गंभीर जखमी झाला आहे. गुरुवारी रात्री ही दुर्घटना घडली.मिरा रोड येथील रामदेव पार्क परिसरात असलेल्या राम कृपा इमारतीच्या तळ मजल्यावर हा प्रकार घडला आहे.
हेही वाचा >>> वसई : नालासोपाऱ्यात पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या मालवाहतूक वाहनांना भीषण आग
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.
गुरुवारी रात्री दहाच्या सुमारास घरात असलेल्या सिलेंडरचा स्फोट झाला.यामुळे प्रचंड मोठा आवाज होऊन अवती-भवती असलेल्या इमारती मधील काचा फुटल्या. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन विभागाने धाव घेऊन आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत संजय नामक तरुण जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काही महिन्यापूर्वीच ही खोली भाड्यावर देण्यात आली होती.घरात स्फोट झालेल्या सिलेंडर व्यतिरिक्त इतर व्यावसायिक ५ सिलेंडर आढळून आले आहे.