भाईंदर : मराठीच्या मुद्द्यावरून निघालेल्या मोर्च्याला मिळालेल्या अभूतपूर्व यशानंतर शुक्रवारी मिरा भाईंदर शहरात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा मराठी जनांची एकजूट पाहायला मिळाली. मनसैनिक आणि शिवसैनिक अशा दोन्हीही कार्यकर्त्यांमध्ये यावेळी उत्साह असल्याचे दिसून आले.

राज्यात हिंदी भाषेच्या सक्तीवरून वातावरण पेटून उठले आहे. या विरोधात मनसेने ठाम भूमिका घेतल्यामुळे राज्य शासनला ठोस निर्णय घेणे कठीण झाले आहे. तर मराठीचा हाच मुद्दा घेऊन राज ठाकरे जनमाणसात जात आहे.काही दिवसापूर्वी मिरा भाईंदर मध्ये मराठी विरुद्ध अमराठी असा वाद उभा राहिला होता. यास मराठी भाषिक नागरिकांनी एकत्र येऊन चोक उत्तर दिले होत. आंदोलनाला आलेला यशानंतर मराठी भाषिक माणसाचे आभार मानण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे जाहीर सभा आयोजित करण्यात आली होती.

तब्बल १८ वर्षानंतर राज ठाकरे हे शहरात जाहीर सभा घेत असल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण होते. त्यामुळे पक्ष कार्यकर्त्यांनी ठाकरेच्या सभेची जय्यत तयारी केली होती. यात मुंबई- अहमदाबाद महामार्गवरील अंधेरी पासून मिरा रोड येथील सभे स्थळापर्यंत जाहिरात फलक लावण्यात आले होते. सायंकाळी चार वाजल्यापासून सभे स्थळी नागरिकांनी जमण्यास सुरवात केली होती. सायंकाळी साडेसहाच्या सुमारास सभा स्थळी प्रचंड गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. मराठी जयघोष, राज ठाकरेंचा जयघोषाने संपूर्ण परिसर दणाणून गेला आहे.

पोलीसांचा कडेकोट बंदोबस्त

सभेच्या ठिकाणी होणारी गर्दी लक्षात घेता, कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी मोठया प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. बालाजी चौकापासून ते सभेच्या ठिकाणापर्यंत ठिकठिकाणी पोलीस तैनात करण्यात आले होते.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मिठाई विक्रेत्याचे दुकान बंद

मराठी भाषेत बोलण्यास नकार देणाऱ्या मिरा रोड येथील ‘जोधपूर’ नामक मिठाई विक्रेत्याला मनसे सैनिकांनी मारहाण केली होती. या घटनेनंतर शहरातील व्यापाऱ्यांनी मराठी भाषिक नागरिकांचा विरोध करण्यासाठी मोर्चा काढला होता.व्यापाऱ्यांच्या याच मोर्चाचा विरोध म्हणून मराठी भाषिक आंदोलन करण्यात आले होते.या आंदोलना मोठा प्रतिसाद मिळाला होता.दरम्यान शुक्रवारी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे मिरा भाईंदर मध्ये आले असता मनसे कार्यकर्त्यांनी याच दुकानाबाहेरील चौकात त्याचे स्वागत केले. या प्रसंगी कोणताही वाद होऊ नये म्हणून मिठाई विक्रेत्याने दुकान बंद ठेवल्याचे दिसून आले.