लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई : नालासोपारा मधील रिचर्ड कंपाऊन येथील एका औद्योगिक कंपनीत दरोडा पडला आहे. ८ ते १० जणांच्या टोळीने सुरक्षा रक्षक आणि एका कर्मचाऱ्याला मारहाण करत १४ लाख रुपये किमतीचे तांबे लुटून तेथून पलायन केले.

मुंबई अहमदाबाद महामार्गाजवळ नालासोपारा येथील रिचर्ड कंपाऊंडमध्ये मनिचा पाडा येथे नेमिकाब केबल इंडस्ट्री आहे. येथे कॉपर कॉइल तयार केली जाते. रात्री अडीचच्या सुमारास आठ ते दहा दरोडेखोरांनी कंपनीत प्रवेश करून तेथे उपस्थित असलेल्या एका कर्मचारी व चौकीदाराला मारहाण करून बांधून ठेवले आणि व कंपनीतील सुमारे १४ लाख रुपये किमतीची तांब्याची कॉईल लुटून फरार झाले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आणखी वाचा-वसई: स्वस्तात घरे देण्याची जाहिरात देऊन अनेकांची फसवणूक, चाळ माफियाला माणिकपूर पोलिसांकडून अटक

पेल्हार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दरोडेखोरांनी ट्रकमध्ये संपूर्ण माल भरून नेला आहे. निघताना त्यांनी ओलिस ठेवलेल्या चौकीदार व कर्मचाऱ्यांची सुटका केली. पेल्हार पोलिसांनी आरोपींच्या शोधासाठी पथक तयार केले असून सीसीटीव्हीच्या माध्यमातून आरोपींचा माग काढण्यात येत आहे.