रिक्षा चालकाशी झालेल्या वादामध्ये एका इसमावर जमावाने हल्ला केला. त्यानंतर अचानक त्यांना हृदविकाराचा झटका आला. त्यात त्यांचा मृत्यू झाला मिलिंद मोरे असे त्यांचे नाव असून ते ठाण्याचे माजी जिल्हाप्रमुख रघुनाथ मोरे यांचे पुत्र आहेत. रविवारी विरारच्या नवापूर येथील एका रिसॉर्ट समोर ही घटना घडली.

हेही वाचा >>>वसई: अर्नाळा समुद्रात जोडप्याचा आत्महत्येचा प्रयत्न; मुलीला वाचवले, मुलाचा शोध सुरू

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ठाण्यात राहणारे मिलिंद मोरे (४७) हे आपल्या कुटुंबासह रविवारी विरारच्या नवापूर येचीतर सेव्हन सी बीच रिसॉर्ट येथे सहलीसाठी आले. यावेळी रिसॉर्ट बाहेरच एका रिक्षाचालकाने मौरे यांच्या पुतण्याला धडक दिली. यामुळे मोरे कुटुंबीयांचा त्या रिक्षा चालकासोबत वाद झाला. काही वेळातच रिक्षा चालक गावात गेला आणि आपल्या साथीदारांना घेऊन आला त्यांनी मिलींद मोरे (४७) , त्यांचा भाऊ तसेच दोन मित्रांवर हल्ला करून बेदम मारहाण केली. या मारहाणीत वर्मी घाव बसल्याने मोरे यांना हृदवविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांचे निधन झाले. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे अशी माहिती अर्नाळा सागरी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय पाटील यांनी दिली.