वसई : वसई विरार महापालिकेतील ८ उपायुक्तांच्या बदल्या झाल्याने उरलेल्या ५ उपायुक्तांवर आता महापालिकेची जबाबदारी आली आहे. शासनाने नवीन उपायुक्तांच्या नियुक्त्या न केल्याने या ५ उपायुक्तांवरच इतरांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. आधीच कामाचा ताण आणि त्यात नवीन जबाबदारी आल्याने या अधिकार्‍यांपुढे मोठे आव्हान निर्माण जाले आहे.

निवडणूक आयोगाच्या आदेशामुळे राज्य शासनाने जिल्ह्यात ३ वर्ष झालेल्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. वसई विरार महापालिकेतील ६ उपायुक्त आणि एका अतिरिक्त आयुक्तांची बदली करण्यात आली होती. त्यामध्ये उपायुक्त विजयकुमार द्वासे, चारूशिला पंडित, नयना ससाणे, तानाजी नरळे, पंकज पाटील आणि संघरत्ना खिल्लारे यांचा समावेश होता. त्या आधी तीन दिवसांपूर्वीच उपायुक्त सागर घोलप यांची कोकण भवनात बदली करण्यात आली होती. तर आरोग्य विभागाचे उपायुक्त विनोद डवले येत्या ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होणार आहेत. वसई विरार महापालिकेत एकूण १३ उपायुक्त होते. परंतु या उपायुक्तांच्या बदल्या झाल्यामुळे आता केवळ ५ उपायुक्त शिल्लक राहिले आहेत. अतिरिक्त आयुक्तपदी बढती झालेले किशोर गवस यांची देखील बदली झाल्याने आता केवळ रमेश मनाळे हे एकमेव अतिरिक्त आयुक्त पालिकेत आहेत. पालिका आयुक्त अनिलकुमार पवार मसुरी येथे प्रशिक्षणासाठी गेल्याने मनाळे यांच्याकडे आयुक्तपदाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

हेही वाचा : परदेशी नागरिकांना भाड्याने घरे देणे पडले महागात, तुळींज पोलिसांनी ११ घर मालकांवर दाखल केले गुन्हे

या उपायुक्तांच्या बदल्या झाल्यानंतर नवीन उपायुक्तांच्या लगेच नियुक्त्या करतील अशी आशा होती. मात्र शुक्रवार संध्याकाळ पर्यंत नियुक्त्या करण्यात आलेल्या नव्हत्या. त्यामुळे आता या उरलेल्या ५ उपायु्क्तांवर इतर उपायुक्ताकडे असलेला कार्यभार सोपविण्यात आला आहे. या ५ उपायुक्तांकडे त्यांच्याकडे असलेल्या मूळ विभागाबरोबरच अन्य विभागांची अतिरिक्त जबाबदारी देण्यात आली आहे. तात्काळ ही जबाबदारी स्विकारून कामाला सुरवात करावी असे आदेश प्रभारी आयुक्त रमेश मनाळे यांनी काढले आहेत.

हेही वाचा : वसई विरारमध्ये पाणी टंचाई, पालिकेकडून पूर्वेच्या भागाला प्रतिदिन २३ टँकरद्वारे पाणी पुरवठा

कुणाकडे कुठला कार्यभार

१) समीर भूमकर- कर, पाणीपट्टी कर, माहिती तंत्रज्ञान परिमंडळ ‘एच’ आणि ‘जी’ परिमंडळ उपायुक्त

२) अजित मुठे- परिमंडळ १, प्रभाग समिती ‘ए’, ‘सी’ तसेच वृक्ष प्राधिकरण, उद्यान, महिला बालकल्याण, पंतप्रधान आवास योजना आदी १० विभागांचा कार्यभार

३) विशाखा मोटघरे- परिडंळ ३ तसेच पर्यावरण, कांदळवन, जाहिरात कर, शिक्षण आधी ६ विभाग

४) नानासाहेब कामठे- मालमत्ता व्यवस्थापन, परिवहन, भांडार तसेच सार्वजनिक आरोग्य, घनकचरा, परिमंडळ ५, विविध शासकीय विभागांचा आढावा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

५) सदानंद पुरव- आस्थापना तसेच परिमंडळ २, सामान्य प्रशासन, क्रिडा, अग्निशमन इत्यादी ७ विभाग