मीरा रोड येथे एका महिलेने आपल्या ६ वर्षाच्या मुलीसह इमारतीच्या गच्चीवरून उडी मारून आत्महत्या केली. शनिवारी दुपारी अडीचच्या सुमानास ही घटना घडली.

हेही वाचा >>> वसईत पुन्हा दरड कोसळली , सातीवली कोंडा पाडा येथील घटना ; सुदैवाने जीवितहानी नाही

काशिमिरा परिसरातील नित्यानंद नगर मधील गौरव गॅलेक्सी या इमारतीत सुरेश देवासी हे पत्नी रेखा देवासी (२८) तसेच अंकिता (६) आणि पूजा (३) या दोन मुलींसह रहात होते. शनिवारी सुरेश नेहमीप्रमाणे कामावर गेले होते. दुपारी अडीचच्या सुमारास त्यांची पत्नी रेखा ही सहा वर्षाच्या अंकिताला घेऊन लिफ्टने इमारतीच्या सहाव्या मजल्यावर आणि तेथून गच्चीवर गेली. काही क्षणातच रेखाने गच्चीवरून अंकिताला घेऊन खाली उडी मारली. दोघींचा जागीच मृत्यू झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

रेखा मागील काही दिवसांपासून मानसिक तणावात होती. तिने आत्महत्येपूर्वी कुठल्याही प्रकारची चिठ्ठी लिहिलेली नव्हती. याप्रकरणी अपमृत्यूची नोंद केली असल्याची माहिती काशिमिरा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय हजारे यांनी दिली.