संदीप धुरत

घाटकोपर -विक्रोळी या परिसरात निवासी प्रकल्प सुरू असून त्याद्वारे उत्तम पर्याय गुंतवणूकदार आणि घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील उपलब्ध सुविधा आणि व्यासायिक प्रकल्प याचा परिणाम भविष्यात येथील स्थावर मालमत्ता गुंतवणूक वधारण्यात होणार हे नक्की!

घा  टकोपर -विक्रोळी हा परिसर मुंबई शहराच्या मध्यभागी वसलेला भाग  आहे.  हा भाग मुख्यत: मुंबईच्या पूर्वेकडील भागातील रहिवासी परिसर आहे.

  •     या परिसराची काही महत्त्वपूर्ण वैशिष्टय़े पुढीलप्रमाणे –

१. मध्यवर्ती ठिकाण- हा परिसर मुंबईतील इतर भागांशी उत्कृष्टरित्या जोडला गेला असल्यामुळे प्रवासासाठी हा परिसर मध्यवर्ती ठरतो.

२. उत्तम कनेक्टिविटी- हा परिसर छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ १९.१ किमी अंतरावर आहे.

२. मुंबईचे एक महत्त्वाचे मध्य रेल्वेवरील स्थानक आहे.

३. या परिसराला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग.

३. हिरवळीने नटलेला परिसर- मुंबईतला हा परिसर निसर्गरम्य म्हणूनही ओळखला जातो.

४. शैक्षणिक केंद्र- अनेक शैक्षणिक संस्था उपलब्ध आहेत.

५. महत्त्वाची हॉस्पिटल आणि आरोग्य केंद्रे- उत्तम हॉस्पिटल्स उपलब्ध आहेत.

६. शॉपिंग मॉल्स आणि वाणिज्यिक केंद्रे- खरेदीसाठी हा परिसर नेहमीच गजबजलेला असतो. या परिसरात बरेच व्यावसायिक आणि गृहनिर्माण प्रकल्प आहेत. हा परिसर मुंबईतील इतर भागांशी उत्कृष्टरित्या जोडला गेला असल्यामुळे प्रवासासाठी परिसर मध्यवर्ती ठरतो. हा मुंबईतील एक अतिशय महत्त्वाचा निवासी परिसर आहे.

या भागात बरीच मोठी रहिवासी संकुले आहेत आणि त्याच्या आसपास बरेच महत्त्वाचे निवासी आणि व्यावसायिक प्रकल्प निर्माण झाले आहेत आणि काही निर्माणाधीन आहेत. जवळील पवई, हिरानंदानी हे एक महत्त्वाचे निवासी आणि वाणिज्य क्षेत्र असून घाटकोपर-विक्रोळी परिसराला जवळ असल्यामुळे त्याचा फायदा येथील स्थावर मालमत्ता क्षेत्राला झाला आहे. स्वातंत्र्यापूर्वी गोदरेज गटाने विक्रोळीमध्ये प्रथम आपले प्रकल्प बांधण्यास सुरुवात केली.

त्यांच्या मते, हे क्षेत्र त्यांच्या निवासी प्रकल्पांसाठी आणि उद्योग आस्थापनांसाठी योग्य आहे. या भागात अनेक नावाजलेले निवासी प्रकल्प आणि बऱ्याच निवासी वसाहती आहेत. घर खरेदी करू इच्छिणाऱ्यांसाठी येथे उत्तम पर्याय उपलब्ध आहेत. जे गृह खरेदी करू शकणाऱ्यांच्या आर्थिक गणितात बसू शकतात.

  •     घाटकोपर-विक्रोळी परिसरातील कनेक्टिव्हिटी –

१. छत्रपती शिवाजी आंतरराष्ट्रीय विमानतळ १९.१ किमी अंतरावर आहे.

२. मुंबईचे एक महत्त्वाचे मध्य रेल्वेवरील स्थानक आहे.

३. या परिसराला जोडणारा मुख्य रस्ता म्हणजे पूर्व द्रुतगती महामार्ग आणि लाल बहादूर शास्त्री मार्ग. या परिसरात अनेक बस स्थानक आहेत आणि त्यायोगे प्रवास सोपा आणि सुलभ होतो. या विभागातील इतर सामाजिक सुविधा आणि शाळा, सामाजिक पायाभूत सुविधा इथे चांगल्या प्रकारे विकसित झाल्या आहेत. इथे अनेक शाळा, महाविद्यालये आणि रुग्णालये आहेत. या परिसरात मनोरंजन पार्क, अनेक बँका आणि एटीएम, पेट्रोल पंप आणि इतर सुविधा आहेत. अनेक नागरी आणि व्यावसायिक संस्था जवळपास आहेत.

  •     विक्रोळीजवळील रोजगार हब –

१. बीकेसी ते घाटकोपर-विक्रोळी- चेंबूर मार्गे साधारणपणे १४ किमी अंतर आहे.

२. नवी मुंबई ते घाटकोपर-विक्रोळी  हे अंतर २२ किमी आहे

३. पवई ते घाटकोपर-विक्रोळी  हे अंतर ईस्टर्न एक्स्प्रेस हायवे व जेव्हीएलआर मार्गे ७ किमी आहे.

४. लोअर परळ ते घाटकोपर-विक्रोळी हे अंतर १८ किमी आहे, यामुळे आपल्या कामाच्या ठिकाणी जाण्याचा प्रवास या परिसराजवळील प्रवास साधनांमुळे सोपा होतो.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सध्या येथे बरेच निवासी प्रकल्प सुरू असून त्याद्वारे उत्तम पर्याय गुंतवणूकदार आणि घर घेऊ इच्छिणाऱ्या ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. त्यामुळे येथील उपलब्ध सुविधा आणि व्यासायिक प्रकल्प याचा परिणाम भविष्यात येथील स्थावर मालमत्ता गुंतवणूक वधारण्यात होणार हे नक्की!