आपल्याला जेव्हा कधीतरी एकटं राहावं असं वाटतं किंवा कोणाशीही बोलू नये असं वाटतं, तेव्हा जर आपण समुद्र किनाऱ्यावर किंवा चौपाटीवर जाऊन बसलो आणि समोर पसरलेल्या अथांग निळसर सागराकडे आणि क्षितिजाने विभागून विलग केलेल्या निळसर आकाशाकडे पाहिलं तर त्यांचं ते शांत, अथांग रूप पाहिलं की, आपण आणि आपल्या समस्या या अथांगतेच्या तुलनेत किती लहान आहेत याची जाणीव होते. तसंच त्या अनंत आकाशाकडे पाहताना आपल्याला आपलं भानच उरत नाही आणि मग मन शांत होतं. तसंच कल्पना करा की आपण अवकाशातून आपल्या पृथ्वीकडे पाहतो आहोत. ती शांत निळसर अवनी आणि त्यावरचा हिरव्या रंगातला टवटवीत भारत पाहताना या सांस्कृतिकदृष्टय़ा समृद्ध असलेल्या देशाच्या विचारसंस्कृतीची पाश्र्वभूमी शांत आणि विचारशील असल्याची साक्षच मिळते. अशा या काळ्याभोर आकाशातल्या निळ्याशार वसुंधरेला पाहतानाही मन शांत होतं आणि त्यावरचा तो इवलासा भारत पाहिल्यानंतर त्या भारतात एखाद्या ठिपक्याप्रमाणे असणारं आपलं ठिकाण पाहिलं की, या विश्वाच्या अफाट पसाऱ्यात आपण किती सूक्ष्म आहोत याची जाणीव होते. तशी ती झाली की, आपले प्रश्न हे आपल्याला किती छोटे आहेत हे जाणवतं. मग मनावरचा ताण हलका होऊन, मन शांत व्हायला मदत होते.
थोडक्यात, मनाला शांती आणि म्हणून स्फूर्ती देणारा रंग म्हणजे निळा रंग! ज्याप्रमाणे सर्वात जास्त म्हणजे दीर्घ तरंगलांबी असलेला असा तांबडा रंग असतो, तसा निळा हा रंग त्या तुलनेत छोटी वेव्हलेंग्थ म्हणजे तरंगलांबी असलेला रंग असतो. त्यामुळे याची फ्रिक्वेन्सी म्हणजेच वारंवारता अधिक असल्यामुळे तांबडय़ा रंगाच्या तुलनेत ऊर्जेचं प्रमाण निळ्या रंगात जास्त असतं. साधं उदाहरण घेऊ, गॅसच्या बर्नरची शुद्ध निळ्या रंगातली ज्योत आणि लालसर निळी असलेली ज्योत यांची जर तुलना केली, तर निळ्या ज्योतीची धग जास्त असते. त्यामुळे अशा ज्योतीवर अन्न अधिक लवकर शिजतं. शिणलेल्या डोळ्यांना निळ्या रंगाकडे पाहताना ऊर्जा मिळते. पण तोच निळा रंग डोळ्यांना शांतवतोसुद्धा! म्हणूनच हा रंग ‘थंड रंग’ या प्रकारात येतो. मात्र, या रंगाच्या विविध छटांवर हा रंग नेमका कसा परिणाम करेल, हेही काही वेळा अवलंबून असतं. आकाशी निळसर जरी मनाला शांतपणा देत असला, तरी कल्पना करा की, छायाचित्र १ मध्ये जे आकाश दिसतंय, ते तिथे नाही आणि केवळ खालचा गडद निळा समुद्रच नजरेसमोर आणा. आता मात्र, हाच सागर मन शांत करण्याऐवजी जर मैलोनमल पसरलेला असला आणि किनारा कुठेच दिसत नसला, तर विशेषत: संध्याकाळच्या वेळी अधिकच गडद होणारा अफाट गडद निळा रंग हा भयाण वाटून मन अधिकच भकास करू शकतो. नराश्यात प्रचंड वाढ होऊ शकते. म्हणूनच इंग्रजीत ‘इछवए’ हा शब्द निळ्या रंगाबरोबरच निराश किंवा दु:खी अशा अर्थानेही वापरला जातो. पण त्या उलट चतन्याने ओतप्रोत भरलेला खळाळत्या पाण्याचा फिक्कट निळसर झरा पाहिल्यावरही आपलं मन अशाच प्रकारे आनंदानं उचंबळून येतं.
अशा प्रकारे आंतरिक शांती आणि प्रसन्न चित्त असलं की, एकाग्रता वाढण्याबरोबरच आकलनशक्ती, विचारशक्ती आणि बुद्धीलाही चालना मिळते. म्हणूनच kVanity Fairl या इंग्रजीतल्या सुप्रसिद्ध कादंबरीचे लेखक आणि कादंबरीकार W. M. Thackeray यांनी त्यांच्या एका कादंबरीत विद्याविभूषित आणि बुद्धिमान या अर्थाने, the ladies were very blue and well-informed असा उल्लेख केलेला आढळतो. त्यामुळे स्टडीरूमसाठी या रंगाचा केलेला वापर अधिक फायदेशीर ठरतो. अभ्यासाला बसण्याच्या जागी समोरच्या भतीवर जर हा रंग असेल, तर मनाची स्थिरता झाली की ज्ञानार्जनाला ते पूरक ठरतं. सर्जनशीलतेलाही हा रंग चालना देतो. त्यामुळे जिथे जिथे सर्जनशील कामं केली जातात, अशा कार्यालयांमध्ये- अॅडव्हर्टाइजमेंट एजन्सीत किंवा वर्तमानपत्रांच्या अथवा टीव्ही वाहिन्यांच्या न्यूजरूममध्ये या रंगाचा वापर सहाय्यभूत ठरतो. दिवसभराची कामं आटोपून आपण रात्री झोपायला जातो तेव्हा सतत कुठल्या ना कुठल्या कामात गुंतलेलं मन मोकळं होतं आणि मग ‘रिकामं मन सतानाचं घर’ या म्हणीप्रमाणे विचारांचा कारखाना सुरू होतो. मग निद्रानाशासारखे विकार जडतात. झोप शांत लागण्यासाठी मन शांत असणं गरजेचं असतं. त्यामुळेच मनाच्या आंतरिक शांतीसाठी बेडरूममध्ये निळ्या रंगाचा केलेला वापर हा शांत झोप लागण्यासाठी मदत करतो. त्याकरता बेडरूमसाठी निळ्या रंगांचा उपयोग हा सगळ्यात चांगला आहे. आतापर्यंत आपण बेडरूमसाठी इतर रंगांचा वापर करताना ते डोक्यामागच्या भिंतीवर लावावेत म्हणजे नजरेसमोर येणार नाहीत असं म्हटलं होतं. मात्र, निळा रंग हा नजरेसमोर येणाऱ्या भिंतींवरच लावावा. अशाच दोन बेडरूम (छायाचित्र ४) मध्ये दाखवल्या आहेत. एकात नािरगी रंग हा डोक्यामागच्या भिंतीवर तर इतर भिंतींसाठी तसंच उशा आणि पांघरुणासाठी निळा रंग वापरलेला दिसतो आहे, तर दुसऱ्या बेडरूमसाठी सर्वच भिंतींवर निळ्या रंगाचा वापर केलेला दिसतोय. मात्र, निळ्या रंगाच्या अतिरेकातून निर्माण होऊ शकणारी दु:खी छटा टाळण्याकरता उशा, बेड, पडदे आणि टेबल लँपकरता मात्र, काळ्या-पांढऱ्या छटांचा वापर केलेला आढळतो. पांढरा आणि निळा हे दोन रंग एकत्रितपणे पाहताना मनाला ताजेपणा आणि उत्साह जाणवतो, तसंच प्रफुल्लित वाटतं. त्यामुळे संपूर्णपणे निळ्या रंगाचा वापर बेडरूममध्ये करण्याऐवजी कधीकधी या दोन रंगांचा केलेला वापर अधिक प्रभावी ठरतो. त्यामुळे सकाळी उठताना सूर्यकिरण घरात येतात, तेव्हा संपूर्ण निळ्या रंगातल्या खोलीपेक्षा अशा खोलीत अधिक ताजं आणि प्रसन्न वाटतं. सर्वसाधारणत: ज्या व्यक्तीला बाकी कसल्याही व्याधी किंवा आजार नाहीत, अशा व्यक्तीच्या बाबतीत मन शांत असलं की, चयापचय क्रियेबरोबरच शरीरातल्या इतर सर्व प्रक्रियाही सुरळीतपणे पार पडतात. आजारी व्यक्तीलाही लवकर आराम वाटण्यासाठी मन शांत असण्याची गरज असते. त्यामुळे जिथे वेगवेगळ्या उपचारपद्धती वापरून रुग्णावर उपचार केले जातात, अशा खोल्यांमध्ये किंवा ऑपरेशन थिएटरमधून आणल्यावर आयसीयूत नेण्याआधी जिथे रुग्णाला ठेवलं जातं, त्या रुग्णालयातल्या रिकव्हरीरूममध्ये जर या रंगाचा वापर केला तर रुग्णाला निश्चितच फायदा होऊ शकतो.
बेडरूमव्यतिरिक्त इतर खोल्यांमध्ये किंवा कार्यालयांमध्ये निळ्या रंगाचा वापर करताना त्याबरोबर निळ्या रंगाच्या विरुद्ध असलेल्या नािरगी रंगाचा वापरही अधिक खुलवणारा असतो. छायाचित्र ४ मधल्या एका बेडरूममध्येसुद्धा ही जोडी आपल्याला दिसते आहे. शेवाळी हिरवा आणि नेव्ही किंवा गडद निळा (छायाचित्र २ मधली भारत आणि सभोवतालच्या समुद्राची जोडी असलेली पृथ्वी पाहा), िलबासारखा पिवळा आणि डार्क निळ्या जिन्स पँटसारखा निळा, तसंच बेबी िपक आणि फिक्का निळा या जोडय़ाही घराचं किंवा कार्यालयाचं सौंदर्य खुलवतात. कुठलाही रंग निवडण्याआधी त्यांच्या जोडय़ा कशा दिसतील हे त्या त्या रंगांच्या रंगछटा एका पुठ्ठय़ावर लावून एकत्रितपणे पाहून ठरवता येईल.
मनोज अणावकर
anaokarm@yahoo.co.in
(इंटिरियर डिझायनर)