– राकेश कुमार

गेल्या काही वर्षांत पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारात मोठे चैतन्य निर्माण झाले आहे. वाढीची संधी आणि राहण्यालायक सुविधा यांचा समतोल साधणारी वसाहत शोधणाऱ्या घरखरेदीदारांसाठी मांजरी विशेष ठिकाण ठरत आहे. शांतता आणि आधुनिक सोयी यांचा सुरेख मिलाफ असलेली मांजरी गुंतवणूक आणि वास्तव्यासाठी, दोन्ही दृष्टीने योग्य ठरत आहे.

पुण्याच्या पूर्वेकडच्या टोकावरचे हिरवाईने नटलेले, शांत आणि मोहक असे मांजरी हे उपनगर आज वेगाने बदलत आहे. कधीकाळी शांत वातावरणासाठी ओळखले जाणारे हे ठिकाण आता बांधकाम व्यावसायिक, गुंतवणूकदार आणि घरखरेदीदार यांच्या नजरा वेधून घेत आहे. अनुकूल भौगोलिक स्थान, झपाटय़ाने उभ्या राहणाऱ्या पायाभूत सुविधा आणि व्यावसायिक केंद्रांशी सुलभ संपर्क या घटकांमुळे मांजरी पुण्यातील शहरी जीवनासाठी सर्वाधिक उत्तम ठिकाण बनू लागले आहे. पुणे शहर त्याच्या परिघाबाहेरच्या दिशेने वाढत असताना, त्यात मांजरीने वेगळे स्थान मिळवले आहे, ते इथल्या जीवनशैलीचा उत्तम अनुभव आणि घराला मिळणारी दीर्घकालीन किंमत यामुळेच!

गेल्या काही वर्षांत पुण्याच्या रिअल इस्टेट बाजारात मोठे चैतन्य निर्माण झाले आहे. वाढीची संधी आणि राहण्यालायक सुविधा यांचा समतोल साधणारी वसाहत शोधणाऱ्या घरखरेदीदारांसाठी मांजरी विशेष ठिकाण ठरत आहे. शांतता आणि आधुनिक सोयी यांचा सुरेख मिलाफ असलेले मांजरी हे गुंतवणूक आणि वास्तव्यासाठी अशा दोन्ही दृष्टीने योग्य ठरत आहे.

वाढीस चालना देणारे संपर्क जाळे

मांजरीचे सर्वात मोठे बलस्थान म्हणजे या भागाची उत्तम कनेक्टिव्हिटी अर्थात संपर्क जाळे. पुणे-सोलापूर महामार्गाच्या जवळ, हडपसरपासून अवघ्या ४ किलोमीटरवर असलेले हे ठिकाण शहराच्या मध्यवर्ती भागाशी सहज जोडले गेले आहे. पुणे रेल्वे स्थानकातून ते फक्त ११ किमीवर आहे. पुणे मेट्रोच्या आगामी विस्तारामुळे इथल्या प्रवासाचा वेळ आणखी कमी होणार आहे. याशिवाय पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळ मांजरीपासून अवघ्या अर्ध्या तासाच्या अंतरावर आहे. विमानाने सतत

प्रवास करणाऱ्यांसाठी हे सोयीस्कर आहे. पीएमपीएमएलची बससेवा व सामायिक प्रवासी पर्याय यांमुळे येथील नागरिक शहरभरात सहजपणे पोहोचू शकतात.

रोजगारकेंद्रांच्या जवळ असल्याचा लाभ

मांजरीची महत्त्वाची जमेची बाजू म्हणजे प्रमुख रोजगारकेंद्रांपासून ते जवळ आहे. खराडीतील इऑन आयटी पार्क, मगरपट्टा एसईझेड, एसपी इन्फोसिटी, अॅेमेझॉन डेव्हलपमेंट सेंटर तसेच हडपसरचे औद्योगिक क्षेत्र यांच्या जवळ असल्याने येथे निवासी जागांची मागणी मोठय़ा प्रमाणावर वाढली आहे. पुणे ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर (जीसीसी) हब म्हणून झपाटय़ाने पुढे जात असताना, मांजरी हे ठिकाण तरुण व्यावसायिकांसाठी आणि त्यांच्या कुटुंबांसाठी अधिक आकर्षक ठरत आहे.

वाढत्या सामाजिक पायाभूत सुविधा

वाढत्या लोकसंख्येच्या गरजांनुसार मांजरीतील सामाजिक सुविधा झपाटय़ाने विकसित होत आहेत. लेक्सिकॉन स्कूल, बिलाबाँग हाय इंटरनॅशनल स्कूल, एमआयटी टेक्नॉलॉजी युनिव्हर्सिटी यांसारख्या शैक्षणिक संस्था कुटुंबांसाठी विशेष आकर्षण ठरत आहेत. मणिपाल हॉस्पिटल, लोटस मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल यांच्या आरोग्यसेवा येथे उपलब्ध आहेत. सुधारित जीवनशैलीच्या दृष्टीने, अॅसमनोरा मॉल, सीझन्स मॉल, तसेच विविध कॅफे, रेस्टॉरंट्स, मनोरंजन केंद्रे या भागांत सहज उपलब्ध आहेत. आगामी िरगरोड प्रकल्प आणि मेट्रोचे विस्तारित जाळे यांमुळे या परिसरातील कनेक्टिव्हिटी अजून बळकट होणार आहे.

प्रगतिशील आणि महत्त्वाकांक्षी वर्ग

आजचे मांजरी हे प्रामुख्याने तरुण आयटी व्यावसायिक, कॉर्पोरेट व्यवस्थापक आणि उद्योजक यांचे निवासस्थान बनले आहे. खराडी, मगरपट्टा, एसपी इन्फोसिटी तसेच विविध ग्लोबल कॅपेबिलिटी सेंटर्समध्ये कार्यरत असलेले सुशिक्षित, महत्त्वाकांक्षी नागरिक या भागात वस्ती करून आहेत. जीवनमान आणि संधी या दोन्ही बाबींचे महत्त्व जाणणारा हा वर्ग आधुनिक सुविधा, उत्तम डिझाईन केलेली घरे आणि सामाजिकदृष्टय़ा समृद्ध वातावरण यासाठी या परिसराकडे आकर्षित होत आहे. त्यामुळेच येथे उत्तम दर्जाच्या निवासी प्रकल्पांची, को-लििव्हग स्पेसेसची आणि चांगल्या जीवनशैलीवर आधारित पायाभूत सुविधांची वाढ होत आहे.

भविष्यातील शक्यता : एक उदयोन्मुख केंद्र

भविष्याचा विचार केला असता, मांजरी परिसरामध्ये विस्ताराची प्रचंड संधी आहे. प्रस्तावित पुणे िरगरोड हा खऱ्या अर्थाने गेम-चेंजर ठरणार असून, तो शहरातील वेगवेगळय़ा भागांशी अधिक चांगली कनेक्टिव्हिटी निर्माण करणार आहे. त्याचबरोबर आयटी आणि औद्योगिक क्षेत्रांचा विस्तार झाल्यामुळे या भागातील रोजगार, गुंतवणूक व भविष्यात किंमती वाढतील. थोडक्यात, मांजरी हा भाग पुण्याच्या विस्ताराच्या प्रवासाला दिशा देणारे केंद्र ठरत आहे. मांजरीचे स्थान, जीवनशैली आणि भविष्यातील विस्तार क्षमता या त्रिसूत्रींमुळे नामांकित बांधकाम व्यावसायिकांचे लक्ष येथे वेधले गेले आहे आणि पुण्याच्या बदलत्या शहरी चित्रात मांजरी सर्वाधिक आकर्षक परिसरांपैकी एक म्हणून वेगाने विस्तारत आहे.

(लेखक बिर्ला इस्टेट्सचे डिझाईन प्रमुख आहेत.)