क्षितिज पटवर्धन यांच्या लेखन-दिग्दर्शनातून साकारलेलं ‘आज्जीबाई जोरात’ हे पहिलं AI महाबालनाट्य ३० एप्रिलला रंगभूमीवर आलं. प्रेक्षकांना खळखळून हसवणाऱ्या ‘आज्जीबाई जोरात’ मध्ये एकापेक्षा एक दमदार कलाकार आहेत. निर्मिती सावंत, अभिनय बेर्डे, मुग्धा गोडबोले, पुष्कर श्रोत्री, जयवंत वाडकर अशा अनुभवी कलाकारांची तगडी फौज देखील या नाटकातून आपल्या भेटीस आली आहे. लोकसत्ता ऑनलाइनच्या डिजिटल अड्डामध्ये या संपूर्ण टीमशी मारलेल्या या दिलखुलास गप्पा…