‘निसर्ग’ चक्रीवादळाचा सर्वत्रच फटका बसला असून लोणावळ्याच्या जवळ असणाऱ्या राजमाची येथील सर्व गावकऱ्यांना नुकसान सहन करावे लागले आहे. राजमाची हे ट्रेकर्ससाठी अत्यंत आवडतं ठिकाण मानलं जातं. दरवर्षी अक्षरश: हजारो गिर्यारोहक राजमाचीला भेट देतात. बुधवारी आलेल्या चक्रीवादळाचा प्रभाव लोणावळ्याच्या परिसरात पाहायला मिळाला. राजमाची येथील अनेक घराचं न भरून येणारं नुकसान झाल आहे.