जिद्दीला सलाम! दिव्यांग असूनही तीन चाकीवर झाडू विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह | Yavatmal
अपघाताने अथवा आजाराने माणूस दिव्यांग झाला की, खचून जातो. आता आपले कसे होईल या विचाराने निराश होतो. परंतु, नरहरी भाऊराव करणे यांनी मनात कोणत्याही प्रकारची निराशा येऊ न देता तीन चाकी सायकलवर झाडू विक्री करून कुटुंबाला आधार दिला आहे. नरहरी भाऊराव करणे यांचे वास्तव्य यवतमाळ शहरातील अशोक नगर डोरलीपुरा येथे आहे. दिव्यंगत्व आल्यावर नरहरी करणे खचून गेले. परंतु, यातून त्यांनी लगेच सावरले. यांनी संपूर्ण यवतमाळ शहर फिरून तीन चाकी सायकलवर झाडू विकून उदरनिर्वाह करतात. सोबत दोन मुले आहेत ते सुद्धा या धंद्यामध्ये हातभार करतात. समाजात स्वाभिमानी जीवन जगण्यासाठी ते आदर्श उदाहरण ठरत आहे.