साताऱ्यातून भाजपाचे उदयनराजे भोसले विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) उमेदवार शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत होणार आहे. उदयनराजे यांच्या उमेदवारीवरून बराच संभ्रम निर्माण झाला होता. अखेर त्यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. तसंच श्रीनिवास पाटील यांच्याऐवजी यंदा शशिकांत शिंदेंना शरद पवारांनी संधी दिली आहे. गेली अनेक वर्ष सातारा पवारांचा बालेकिल्ला राहिला आहे. मात्र २०१९ला उदयनराजेंनी भाजपाला साथ दिली. त्यानिवडणुकीत उदयनराजेंना पराभवाचा सामना करावा लागला होता. यंदा उदयनराजे यांच्याविरोधात शशिकांत शिंदेंचं आव्हान असणार आहे. त्यामुळे कोणाचं पारडं जड ठरणार? यावर केलेलं हे विश्लेषण पाहा.