South Africa Malawi Mango in Pune: ‘मालावी’ आंबा पुण्यात दाखल, काय आहे खास? जाणून घ्या
कोकणातील हापूस आंब्याच्या हंगामापूर्वीच पुण्यातील मार्केटयार्डात साऊथ आफ्रिकेतील मालावी आंबा पुण्यात दाखल झाला आहे. त्यामुळे एकंदरीतच पुणेकर नागरिकांना अडीच महिने अगोदरच आंब्याची चव चाखता येणार आहे. याबाबत व्यापारी सलीम बागवान म्हणाले की, साऊथ आफ्रिकेतील मालावी येथे सात ते आठ वर्षापूर्वी कोकणातील हापूस आंब्याची रोपे लावण्यात आली होती. त्याच रोपांची ही आंबे असून कोकणातील आंब्या सारखीच चव आहे