भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मुंडेंच्या द्वितीय कन्या व भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी तब्बल ९ लाख १६ हजार ९२३ मते घेऊन पहिल्याच प्रयत्नात विक्रमी विजय संपादन केला. देशात सर्वाधिक मताधिक्याचा हा विक्रम ठरला. त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील यांना केवळ २ लाख २४ हजार ६७८ मते मिळाली. तब्बल ६ लाख ९२ हजार २४५ मतांच्या फरकाने डॉ. मुंडे यांनी विजय मिळवला. गोपीनाथ मुंडे यांच्या अपघाती निधनानंतर विधानसभेसह लोकसभेची पोटनिवडणूक झाली.
मुंडे कुटुंबातील सदस्याविरुद्ध उमेदवार देणार नसल्याची घोषणा राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली होती, मात्र आघाडी तुटल्यामुळे लोकसभेसाठी काँग्रेसचे उमेदवार अशोक पाटील मदानात उतरल्याने निवडणूक झाली. एकूण १२ उमेदवार िरगणात होते. १३ लाख मतदारांनी मताचा हक्क बजावला. यात पाटील यांना २ लाख २४ हजार ६७८, तर इतर उमेदवारांनी एक लाख मते घेतली. डॉ. मुंडे यांनी मोठय़ा फरकाने विजय मिळवला. संपूर्ण देशात लोकसभा निवडणुकीत विक्रमी मते मिळवणाऱ्या त्या एकमेव उमेदवार असाव्यात.
संग्रहित लेख, दिनांक 20th Oct 2014 रोजी प्रकाशित
पावणेसात लाखाच्या फरकाने प्रीतम खाडे-मुंडे यांचा विजय
भाजपचे नेते गोपीनाथ मुंडे यांच्या निधनाने रिक्त झालेल्या बीड लोकसभेच्या पोटनिवडणुकीत मुंडेंच्या द्वितीय कन्या व भाजप उमेदवार डॉ. प्रीतम मुंडे यांनी तब्बल ९ लाख १६ हजार ९२३ मते घेऊन पहिल्याच प्रयत्नात विक्रमी विजय संपादन केला.
First published on: 20-10-2014 at 05:51 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Beed ls by poll pritam munde khade leading by 6 lakh votes