युती तोडणारे याच जळगाव जिल्ह्य़ातील आजुबाजूला उभे असणारे नेते असून ज्यांच्यामुळे युती तुटली, त्यांच्या मतदारसंघात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, असा विश्वास युवा सेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनी येथे आयोजित प्रचार सभेत व्यक्त केला.
भाजपचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर नाव न घेता ठाकरे यांनी टिकास्त्र सोडले. युती भाजपच्या हट्टामुळेच तुटली. आपण स्वत: चर्चेला गेलो होतो. बाळासाहेब ठाकरे, प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे यांनी २५ वर्षांपूर्वी तयार केलेली युती तोडू नये म्हणून हात जोडून विनंती केली होती. महाराष्ट्रातील भाजपच्या चार ते पाच नेत्यांमुळेच युती तुटली, असा आरोप ठाकरे यांनी केला.
संग्रहित लेख, दिनांक 10th Oct 2014 रोजी प्रकाशित
‘ज्यांच्यामुळे युती तुटली, तेथे भगवाच फडकेल’
युती तोडणारे याच जळगाव जिल्ह्य़ातील आजुबाजूला उभे असणारे नेते असून ज्यांच्यामुळे युती तुटली, त्यांच्या मतदारसंघात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही
First published on: 10-10-2014 at 03:13 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Eknath khadse jalgaon shiv sena mahayuti break up