केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा प्रचार करण्याचे ठरविले आहे. हरयाणातही लोकजनशक्ती पार्टी भाजपचा प्रचार करणार आहे.
लोकजनशक्ती पार्टीच्या मध्यवर्ती संसदीय मंडळाची बैठक चिराग पासवान यांच्या नेतृत्वाखाली पार पडली. त्यामध्ये भाजपप्रणीत एनडीएच्या उमेदवारांना विधानसभेच्या निवडणुकीत पाठिंबा देण्याचा निर्णय पक्षाने घेतला. देशातील प्रत्येक राज्यात पंचायत आणि महापालिका निवडणुका लढण्याचा निर्णयही या बैठकीत घेण्यात आला.
संग्रहित लेख, दिनांक 28th Sep 2014 रोजी प्रकाशित
लोकजनशक्ती पार्टी एनडीएचा प्रचार करणार
केंद्रीय मंत्री रामविलास पासवान यांच्या नेतृत्वाखालील लोकजनशक्ती पार्टीने महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीत भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएचा प्रचार करण्याचे ठरविले आहे.
First published on: 28-09-2014 at 02:01 IST
मराठीतील सर्व विधानसभा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ljp to campaign for bjp for maharashtra