चिन्मय पाटणकर

न्या. महादेव गोविंद रानडे यांच्या पुढाकारातून स्थापन झालेली डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी अर्थात् महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था पुढील वर्षी शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष साजरे करणार आहे. महाराष्ट्राच्या साहित्यिक जडणघडणीत मोलाचे योगदान देणारी ही संस्था. महाराष्ट्रातील लेखक, साहित्यिक, अनुवादकांना, पर्यायाने बुद्धिवैभवाला उत्तेजन देण्याचा संस्थेचा वसा महाराष्ट्राला समृद्ध करणारा आहे.

AMU gets its first woman VC Naima Khatoon
व्यक्तिवेध : नईमा खातून
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Prof. Rupesh Mahadik
ठाणे महाविद्यालयाचे प्राध्यापक रुपेश महाडीक यांचा आदर्श अध्यापक पुरस्काराने सन्मान
Pune University Cancels Professor s Guideship for Demanding Bribe
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून ‘त्या’ लाचखोर प्राध्यापिकेवर कारवाई

महाराष्ट्राला थोर सुधारक, लेखक, अभ्यासकांची मोठी परंपरा आहे. न्या. महादेव गोिवद रानडे हे त्यातलेच एक महत्त्वाचे नाव. सामाजिक सुधारणांचा आग्रह धरतानाच रानडे यांनी ग्रंथनिर्मिती केली, परखड विचार मांडले आणि बुद्धिवैभवाला पूरक अशा संस्थाही स्थापन केल्या. तेव्हाची डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी, अर्थात आजची महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था रानडे यांच्याच आग्रहाने स्थापन झालेली संस्था. ती गेल्या १२४ वर्षांपासून कार्यरत आहे.

डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीची पाश्र्वभूमी रंजक आहे. पेशवे सरकार दरवर्षी चातुर्मासात विद्वानांना दक्षिणा देत असे. त्यात वैदिक विद्वान, इतर पंथीय विद्वान आणि अन्य धर्मातील पंडितांचा समावेश असे. इंग्रज राजवट सुरू झाल्यावर लॉर्ड एल्फिन्स्टन या गव्हर्नराने ही प्रथा पुढे सुरू ठेवली. त्यानंतर तत्कालीन मुंबई सरकारने दक्षिणा फंड म्हणून सरकारात स्वतंत्र निधी ठेवला. त्यातून शिक्षणास उत्तेजन आणि ग्रंथांना पुरस्कार मिळू लागला. योग्य ग्रंथांची शिफारस करण्यासाठी सरकारने १८५१ मध्ये ‘दक्षिणा प्राइज कमिटी’ स्थापन केली. त्याआधी १८४९ मध्ये कर्नल टी फ्रेंच आणि कॅप्टन हॉर्ट यांनी डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटी नावाची संस्था स्थापन केली होती. संस्थेला बडोद्याचे गायकवाड यांच्यासह काहींनी २५ हजारांचा निधी दिला होता. या संस्थेने काही ग्रंथ प्रकाशित केले. मात्र, कालांतराने ही संस्था बंद पडली. त्यानंतर न्या. महादेव गोिवद रानडे यांनी संस्था पुनरुज्जीवित करण्यासाठी पुढाकार घेतला. रानडे यांनी संस्था स्थापन करताना पूर्वीच्याच संस्थेची वारस आहे असे दाखवले, तर त्या संस्थेकडे असलेल्या निधीचा वापर करून घेता येईल असा विचार केला. म्हणूनच पुण्यात १८९४ मध्ये डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन सोसायटीची स्थापना झाली. त्यानंतर जुन्या संस्थेकडे असलेली चार हजारांची रक्कम संस्थेला मिळाली.

मराठी भाषेचा प्रचार करणे, इंग्रजी, संस्कृतादी भाषांमधील उपयुक्त पुस्तकांची भाषांतरे करणे आणि करून घेणे, महाराष्ट्रात विद्यावृद्धीसाठी सर्व प्रकारचे उत्तेजन देणे आणि नवीन उपयुक्त पुस्तकांसाठी यथाशक्ती मदत करण्याच्या हेतूने न्या. महादेव गोिवद रानडे यांच्या पुढाकारातून डेक्कन व्हर्नाक्युलर ट्रान्स्लेशन  सोसायटीची स्थापना झाली. डॉ. रामकृष्ण गोपाळ भांडारकर संस्थेचे पहिले अध्यक्ष होते. संस्थापकांमध्ये लोकमान्य बाळ गंगाधर टिळक, नी. ज. कीर्तने, वामन आबाजी मोडक, कादंबरीकार हरी नारायण आपटे, आबाजी विष्णू काथवटे अशा विविध क्षेत्रांतील विद्वानांचा समावेश होता. १८९५ मध्ये सरकारच्या ‘दक्षिणा प्राइज कमिटी’चे काम संस्थेकडे आले. १९४८ मध्ये संस्थेचे इंग्रजी नाव बदलून महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था असे मराठी नामकरण करावे, असा ठराव संस्थेने मंजूर केला. १८९६च्या सुमारास न्या. रानडे आणि न्या. तेलंग यांच्या प्रयत्नांमुळे सरकारने पेशवे दप्तर अभ्यासकांसाठी खुले केले. डेक्कन व्हर्नाक्युलर सोसायटीच्या वतीने इतिहासकार द. ब. पारसनीस आणि रा. ब. वाड यांनी पेशवे दप्तरातील ५० हजार कागदपत्रे निवडून पेशवे रोजनिशीचे एकूण नऊ खंड प्रसिद्ध केले.  अनेक इतिहासविषयक संशोधनाचे ग्रंथ संस्थेने प्रसिद्ध केले आहेत. या संस्थेने महाराष्ट्रातील जवळपास सर्व विद्वान ग्रंथकारांना पारितोषिके देऊन गौरवले आहे. त्यात ह. ना. आपटे, केशवसुत, इतिहासाचार्य राजवाडे, शि. म. परांजपे, ना. सी. फडके, रियासतकार गो. स. सरदेसाई, महामहोपाध्याय द. वा. पोतदार, सानेगुरुजी, श्री. म. माटे, भा. रा. तांबे, कवी यशवंत आदींचा समावेश आहे.

ग्रंथोत्तेजनाबरोबरच ज्ञानवृद्धी आणि प्रबोधन हेही संस्थेचे उद्दिष्ट आहे. त्यामुळे ग्रंथपुरस्कारांबरोबरच ग्रंथनिर्मितीलाही प्रोत्साहन द्यावे, या विचारातून ग्रंथनिर्मितीसाठी ग्रंथकारांना पूर्णत: किंवा अंशत: निर्मितीखर्च देण्यास सुरुवात केली. मात्र, तो अनुभव प्रोत्साहक नव्हता. जमाखर्चाची तोंडमिळवणी करणे अवघड झाल्याने संस्थेने तो प्रयोग बंद केला. काही वर्षांनी पुन्हा प्रकाशनाची ऊर्मी उचंबळून आली आणि नूतन भारतवर्ष हे मासिक सुरू केले. मात्र, तो प्रयत्नही अल्पजीवीच ठरला. त्यानंतर संस्थेने पुन्हा प्रकाशनाचे प्रयत्न केले नाहीत. त्यानंतर मराठी ग्रंथनिर्मितीची वाटचाल, संस्थेच्या वाटचालीचा वेध घेणाऱ्या उषा रानडे लिखित एका शतकाची वाटचाल आणि श्री. ना. चाफेकर यांचे भाषापत्र हे तीन ग्रंथ प्रकाशित केले. सध्या संस्थेच्या अध्यक्षपदी मूर्तिशास्त्राचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. गो. बं. देगलूरकर आहेत. तर कार्यकारी मंडळात डॉ. पुष्पा लिमये, डॉ. अविनाश चाफेकर, ज्येष्ठ विधिज्ञ दादासाहेब बेंद्रे अशा मान्यवरांचा समावेश आहे.

दुर्मीळ ग्रंथठेवा

स्वातंत्र्यपूर्व काळापासून अव्याहत कार्यरत असलेल्या संस्थेकडे हजारो मौलिक पुस्तके, ग्रंथ आहेत. त्यात पेशव्यांची रोजनिश्या आहेत. अर्थात या रोजनिश्या पेशव्यांनी लिहिलेल्या नाहीत. मात्र त्यांच्या कारभाऱ्यांनी लिहिलेल्या या रोजनिश्यांमध्ये त्या वेळचा जमाखर्च आहे. ग्रंथपरीक्षांची परंपरा मराठीत सुरू झाल्याचा शोध संस्थेकडे असलेल्या ग्रंथपरीक्षणांतून घेता येऊ शकतो. १८९४ पासून अनेक विद्वानांनी केलेल्या ग्रंथपरीक्षणांचा त्यात समावेश आहे. न्या. रानडे यांचा पत्रव्यवहारही संस्थेने जतन केला आहे. विविध विषयांवरील ३० अभ्यासपूर्ण प्रबंधांची हस्तलिखिते, शंभर वर्षांपूर्वीचे हस्तलिखित ग्रंथ, जुन्या पोथ्याही आहेत. ज्ञानप्रसारासाठी ह. ना. आपटे आणि द. ब. पासरनीस यांनी १८९५ मध्ये सुरू केलेल्या भारतवर्ष या मासिकाचे अंकही संस्थेच्या संग्रही आहेत. संस्थेकडे पारितोषिकांसाठी आलेल्या पुस्तकांचा ठेवा आहे. जवळपास ३२ प्रकारचे कोश आहेत.

ऊर्जितावस्थेसाठी नवी इमारत

संस्थेकडे जवळपास तीस लाखांच्या ठेवी आहेत. मात्र, त्यातून वार्षिक ग्रंथ पुरस्कार आणि दैनंदिन कामकाजाचा खर्च जेमतेम भागतो. निधीची चणचण असल्याने वेगळे उपक्रम राबविण्यावर मर्यादा येतात. राज्य सरकारने संस्थेला पौड रस्त्यावरील वेदभवनजवळ दहा गुंठे जागा दिली. त्या जागी संस्थेने दक्षिणा भवन उभारण्याचा संकल्प केला आहे. या संस्थेला ऊर्जितावस्था येण्यासाठी नव्या इमारतीची आवश्यक आहे. संस्थेला सरकारकडून जागा मिळाली तरी निधीची अडचण असल्याने इमारत बांधता आलेली नाही. अलीकडेच एका बांधकाम व्यावसायिकाच्या सहकार्याने इमारतीची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दुर्मीळ पुस्तकांची जपणूक होण्यासाठी त्यांचे डिजिटायझेशन होणे अत्यावश्यक आहे. संस्थेतील ग्रंथांचे महत्त्व ओळखून काही वर्षांपूर्वी महाराष्ट्र ज्ञान महामंडळाने (एमकेसीएल) एक हजार पुस्तकांच्या डिजिटायझेशनचा प्रकल्प हाती घेतला आहे. त्याच्या खर्चाची जबाबदारी एमकेसीएलनेच उचलली आहे. काही ग्रंथांच्या डिजिटायझेशनचे काम झाले आहे. तसेच बंगळूरुच्या सेंटर फॉर इंटरनेट अ‍ॅण्ड सोसायटी या संस्थेशी करार झाला आहे. त्याद्वारे संस्थेतील स्वामित्व हक्क मुक्त झालेली निवडक पुस्तके आणि ग्रंथ मराठी विकिपीडियावर उपलब्ध होतील.

संस्थेपर्यंत कसे पोहोचाल?

महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था

पुण्यातील मध्यवर्ती सदाशिव पेठेत खुन्या मुरलीधर मंदिराकडून बाजीराव रस्त्याकडे जाताना डाव्या बाजूला, टिळक महाराष्ट्र विद्यापीठाच्या जवळच्या इमारतीत महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्थेचे कार्यालय आहे.

धनादेश -‘महाराष्ट्र ग्रंथोत्तेजक संस्था’

(Maharashtra Granthottejak Sanstha)

या नावाने काढावा.  धनादेशामागे अथवा सोबत देणगीदाराने त्याचे संपूर्ण नाव, पत्ता, दूरध्वनी तसेच मोबाइल क्रमांक लिहावा.संस्थेकडे धनादेश ऑक्टोबर महिन्याच्या अखेरीस सुपूर्द केले जातील.

धनादेश येथे पाठवा..

एक हजार किंवा त्याहून अधिक रुपयांची देणगी देणाऱ्यांची नावे ‘लोकसत्ता’त प्रसिद्ध केली जातील.

मुंबई कार्यालय

लोकसत्ता, संपादकीय विभाग, मफतलाल सेंटर, सातवा मजला, नरिमन पॉइंट, मुंबई – ४०००२१,  ०२२-६७४४०२५०

महापे कार्यालय  

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ईएल १३८, टीटीसी इंड. एरिया, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई – ४००७१०.  ०२२-२७६३९९००

ठाणे कार्यालय    

संपादकीय विभाग, कुसुमांजली बिल्डिंग, दुसरा मजला, गोखले रोड, नौपाडा, ठाणे.  ०२२-२५३९९६०७

पुणे कार्यालय      

संपादकीय विभाग, एक्स्प्रेस हाऊस, प्लॉट नं. १२०५/२/६, शिरोळे रस्ता, पुणे – ४११००४.  ०२०-६७२४११२५

नाशिक कार्यालय       

संपादकीय विभाग, स्टेडियम कॉम्प्लेक्स नं. ६, पहिला मजला, महात्मा गांधी मार्ग, नाशिक – ४२२००१.  ०२५३-२३१०४४४

नागपूर कार्यालय    

संपादकीय विभाग, प्लॉट नं. ३८, अ‍ॅडिसन ट्रेड सेंटर, अंबाझरी नागपूर – ४४००१०, ०७१२ झ्र् २२३०४२१

औरंगाबाद कार्यालय       

संपादकीय विभाग, १०३, गोमटेश मार्केट, गुलमंडी, औरंगाबाद. दूरध्वनी क्रमांक ०२४०-२३४६३०३, २३४८३०३

नगर कार्यालय       

संपादकीय विभाग, १६६, अंबर प्लाझा, स्टेशन रोड, अहमदनगर. ०२४१-२४५१५४४/ २४५१९०७

दिल्ली कार्यालय       

संपादकीय विभाग, द इंडियन एक्स्प्रेस बिल्डिंग, बी१/ बी, सेक्टर १०, नॉएडा – २०१३० उत्तर प्रदेश    ०११- २०६६५१५००