मोठय़ा मल्टिनॅशनल कंपन्यांमधल्या जॉब ऑफरपेक्षा तरुणाईची पसंती छोटय़ा स्टार्ट-अपला आहे. कारण सध्या ‘वर्किंग फॉर अ स्टार्टअप इज इन थिंग’. तरुणाईला नव्या कंपन्यांमध्ये काम करायला मजा येतेय. थ्रिलिंग वाटतंय.

‘हाय अजय, अभिनंदन! नवीन जॉब मिळाल्याबद्दल. मग पॅकेज काय आहे?’

‘पाच लाख.. पण काम झकास आहे.’

‘अरे वा! मोठी मल्टिनॅशनल कंपनी दिसतेय. सुरुवात छान आहे.’

‘अरे आत्ताच दीड वर्षांपूर्वी सुरू झालीय आमची कंपनी. स्टार्टअप आहे रे!’

‘सुरुवातच अननोन कंपनी पासून का?’

‘वर्किंग इन स्टार्ट-अप इज थ्रिल. खूप शिकायला मिळतंय, मोठी जबाबदारी आहे.’

असे संवाद सध्या खूप ठिकाणी ऐकायला मिळतील. प्लेसमेंट सेलमध्ये सध्या स्टार्ट-अप्सची चलती आहे. एक काळ असा होता की, आयबीएम, गुगल, मायक्रोसॉफ्ट अशा नावाजलेल्या कंपन्यांमध्ये काम करायला नुकतीच पास झालेली तरुणाई उत्सुक असायची. कंपनी जितकी बडी तितकी त्यांची कॉलर ताठ व्हायची, पण यंदा चित्र थोडं वेगळं दिसतंय. या कंपन्यांबरोबरच यंगस्टर्स कामाचं स्वरूप काय, हा प्रश्न विचारायला लागलेत आणि म्हणूनच अगदी नव्या कंपन्यांमध्येही (स्टार्टअप्स) रुजू व्हायला लागले आहेत. आजची जनरेशन फक्त ब्रँडनेम नाही बघत, तर त्यासोबत इनोव्हेशन, मोटिव्हेशन, चान्स फॉर ग्रोथ अशा सर्वच गोष्टी बघते. म्हणूनच ‘स्टार्टअप’मध्ये काम करण्याची क्रेझ वाढतेय.

ट्रबिल डॉट कॉम या सहा महिन्यांपूर्वी सुरू झालेल्या कंपनीत कस्टमर सव्‍‌र्हिस एक्झिक्युटिव्ह म्हणून काम करणारी अंजू अग्रवाल सांगते, ‘सेटल्ड कंपनीत काम करताना चांगली पोझिशन मिळवायला वेळ लागतो. स्टार्टअप कंपनीत सुरुवातीपासून काम केल्यावर लवकर अनुभव मिळतो आणि ग्रोथ रेट वाढतो.’

नेम-फेम आणि ब्रँड सोडून नुकत्याच जन्म झालेल्या कंपनीला का प्राधान्य देतील आजचे तरुण? याबाबतीत बोलताना ‘शॉप्टिमाईझ’ नावाच्या कंपनीत बिझनेस अ‍ॅनालिस्ट या पदावर काम करणारी राधिका पांडे म्हणाली, ‘आमच्या नवीन आयडीयाज्ना इथे वाव मिळतो, कामात जास्त क्रिएटिव्हिटी असते. हे माझ्या मते स्टार्टअपचे फायदे आहेत. काम करणारा ग्रुप मोस्टली यंग असतो आणि त्यांची आपसातली अंडरस्टँडिंग लेव्हल छान असते. त्यामुळे इट्स फन टू वर्क विथ देम.’

बंगळुरूच्या ‘लीडिंग अ‍ॅनालेटिक्स’ कंपनीत डोमेन कन्सलटंट म्हणून काम बघणाऱ्या मेहूल दीक्षितच्या मते, ‘स्टार्टअप्समध्ये जास्त फ्रीडम आणि जास्त ऑटोनॉमी असते. क्विक मूव्हिंग आणि फास्ट चेंजिंग कल्चरमुळे इथलं वातावरण छान असतं. अगदी कमी वेळात तुम्ही अनेक कामं शिकून घेऊ शकता. हायरारकी नसते, वर चढायला स्कोप जास्त असतो.’

एका बाजूला स्टार्टअप्समध्ये काम करणारे यंगस्टर्स आहेत, तर दुसऱ्या बाजूला स्वत:ची कंपनी सुरू करणारेही तरुण. यंगिस्तानवर स्टार्टअप्सची जादू आहे. यंग इंडिया इज ड्रीमिंग बिग.

vv02स्वतची बलस्थानं शोधायची असतील, तर स्टार्टअपमध्येच जायला पाहिजे. इथे काम करणारा ग्रूप यंग असतो. बॉस कल्चर नसतं. इट्स फन टू वर्क विथ देम.
– राधिका पांडे
निहारिका पोळ – viva.loksatta@gmail.com