प्रसिद्ध फॅशन डिझायनर आणि स्टायलिस्ट अमित दिवेकर तुमच्या स्टायलिंगविषयीच्या प्रश्नांना उत्तरं देणार आहेत. ‘ठकाळ’मधून फॅशनचं प्रशिक्षण घेतलेल्या अमित यांनी देशविदेशात अनेक फॅशन शोज्साठी आणि इव्हेंट्ससाठी डिझायिनग केलं आहे. चित्रपटांच्या वेशभूषा करण्याबरोबरच पॉपस्टार शकिरा तसंच हॉलीवूड अभिनेत्री केट ब्लँकेट यांच्या रेड कार्पेट लुकसाठी डिझाइन करण्याची संधीदेखील त्यांना मिळाली होती. अमित यांना विचारण्याचे फॅशनविषयीचे प्रश्न viva@expressindia.com या मेलवर पाठवा.
हाय अमित,
माझं नाव हर्षद उबाळे. मी तुझा कॉलम नेहमी वाचतो. त्यात मुलांबद्दल अभावानंच येतं. मुलांच्या स्टाइलिंगविषयी मला थोडं जाणून घ्यायचंय. माझी उंची ५. ५ फूट आहे. माझं कॉम्लेक्शन काहीसं डार्क आहे. माझ वजन ६५ किलो आहे. मला ऑफिससाठी तसंच नेहमीच्या वापरासाठी कपडे सुचव. तसेच हेअर कट्सबद्दलही सांग.
हॅलो हर्षद,
तुझी उंची आणि वजन प्रमाणबद्ध आहे. तुझं कॉम्प्लेक्शन व्हिटिश टॅन असावं असा माझा अंदाज आहे. आणि ही गुड न्यूज आहे. कारण अशा वर्णाला कोणतेही रंग खुलून दिसतात. त्यामुळे तुला आवडतील ते रंग आणि प्रिंट्स तू वापर. फॉर्मल वेअरमध्ये न्यूट्रल कलर्स बॉटमसाठी ठेव. न्यूट्रल कलर म्हणजे ब्लॅक, ग्रे, बेज, नेव्ही हे रंग पँट्सचे असू दे. प्लीटेडऐवजी फ्रंट फिटेड पँट्स वापर. तू कॅज्युअल वेअर म्हणून चीनोजसुद्धा वापरू शकतोस. शर्ट्ससाठी मी सजेस्ट करीन डार्क किंवा पेस्टल कलर्स वापर. डार्क किंवा लाइट ब्लू, मिंट किंवा एमराल्ड ग्रीन, पीच किंवा रस्ट हे कलर्स तुला शोभून दिसतील. स्लीम फिट फुल स्लीव्ह्ज् शर्ट वापर. लेदरचा ब्लॅक किंवा ब्राऊन बेल्ट वापर. फॉर्मल शूज वापर. मस्त लेदरची सॅचेल बॅग वापर, मेटॅलिक घडय़ाळ वापर. इतरांपेक्षा तू नक्कीच छान दिसशील. या अॅक्सेसरीज त्यासाठी मोठी भूमिका बजावतात.
कॅज्युअल वेअरसाठी अनेक ऑप्शन्स आहेत. वेगवेगळ्या शेड्सच्या जीन्स, वेगवेगळ्या कलर्सचे चीनोज, व्ही नेक, राऊंड नेक टीशर्ट्स हे सगळं तू वापरू शकतोस. मी सगळ्या मुलांना एक सांगू इच्छितो उगाचच भडक लोगोज किंवा नॉनसेन्स मेसेज असलेले टीशर्ट्स अज्जिबात वापरू नका. त्याच बरोबर उगाचच मोठे बेल्ट्स वापरू नका ते फक्त आर्मी आणि पोलीस यांच्यासाठीच असतात. लहान बेल्ट्स फॉर्मल्ससाठी आणि जरासा मोठा इतर वेळी हे समीकरण पक्कं करा. प्लेन सॉलिड कलर्स किंवा स्ट्रिप्स तसेच ऑलओव्हर बारीक प्रिंट असलेले कपडे वापर. लोफर्स किंवा लेदर सँड्ल्स कॅज्युअल वेअरवर वापर. मस्त व्हाइट टीशर्ट्स, गुड फिटिंग डार्क वॉश जीन्स, ब्लॅक वेल फिटेड टीशर्ट, छानसा टॅन बेल्ट, ब्लॅक कॅनव्हास शूज हे बेसिक कॅज्युअल वेअर्स नक्कीच कलेक्शनमध्ये ठेव. डे आणि नाइट अशा दोन्ही वेळी तुला ते उपयोगी पडेल. तू तुझ्या केसांचा प्रकार किंवा रंग मेन्शन केला नाहीस, परंतु तुला सूट होईल, असे मस्त हेअर कट करून घे. वाटल्यास एखाद्या हेअर एक्स्पर्टची मदत घे.
viva.loksatta@gmail.com