‘काय मस्त गोल मारलाय यार याने.. कमालच!’ रात्री दोन वाजता डोळे ताणून टीव्हीसमोर बसून अशी प्रतिक्रिया येणे ही हल्ली अत्यंत स्वाभाविक गोष्ट झाली आहे. यालाच आम्ही फिफा फीवर म्हणतो. सध्या सगळीच मुलं या फुटबॉल तापाने फणफणली आहेत. हो.. पण या तापाचेही प्रकार आहेत बरं का. कुणी खरंच खेळाच्या वेडात तापलेला, कुणी नुसताच खेळाडूवरच्या प्रेमाच्या साथीत अडकलेला, कुणाला संसर्गानं भरलेला ताप तर कुणाचा ताप कायम अंगात भिनलेला..
या तापात मुलींचा ताप मात्र वेगळाच! मुलींना काय कळतं फुटबॉलमधलं, त्या फक्त खेळाडूंचं दिसणं बघतात आणि त्यावरूनच फेव्हरेट प्लेअर ठरवतात, अशी सर्वसाधारण भावना. मनापासून खेळ पाहणाऱ्या मुलींसाठी हा आता गरम चर्चेचा विषय झालाय. मुलींची फुटबॉल क्रेझ या विषयावर वेगळी मतं मांडणारे हे लेख..
संग्रहित लेख, दिनांक 27th Jun 2014 रोजी प्रकाशित
फिफा फीवर
‘काय मस्त गोल मारलाय यार याने.. कमालच!’ रात्री दोन वाजता डोळे ताणून टीव्हीसमोर बसून अशी प्रतिक्रिया येणे ही हल्ली अत्यंत स्वाभाविक गोष्ट झाली आहे.
First published on: 27-06-2014 at 01:24 IST
मराठीतील सर्व व्हिवा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Fifa world cup fever