‘हाफ गर्लफ्रेंडच्या निमित्ताने
व्हिवा मध्ये मध्यंतरी हाफ गर्लफ्रेंड याविषयी लेख आले होते. ‘हाफ गर्लफ्रेंडच्या निमित्ताने मांडलेली ही एक जाहीर मनोव्यथा! ‘मेरा भारत महान म्हणत मातृभूमीचे गोडवे गाणारी आजची तरुणाई दुर्दैवानं भारतीय संस्कृतीला आणि संस्कारांना पायदळी तुडवून ‘रिलेशनशिप’च्या नावाखाली अनतिक जीवनसुख उपभोगण्यास उतावीळ झाली आहे. खरं तर प्रेम ही एक सुंदर आणि पवित्र भावना असून त्या अडीच अक्षरांमध्ये अवघे विश्व पेलण्याचे सामर्थ्य आहे. हे आजच्या बेभान तरुणाईला मुळी कळलेलंच नाहीये. रात्री उशिरापर्यंत चालणाऱ्या पाटर्य़ामध्ये मद्यपान करून, एवढेच नव्हे तर जोडीदाराबरोबर ‘ओव्हरनाइट स्टे करून सगळी मज्जा अनुभवणे यालाच पवित्र प्रेम म्हणतात काय? तरुणाईच्या मते प्रेमाची व्याख्या हीच आहे काय? विवाहानंतरच्या सहवासात प्रथमस्पर्शातून जो अत्युच्च प्रणयानंद नवदाम्पत्य उपभोगतात, तो आनंद विवाह न करता अनतिक ‘रिलेशनशिप प्रस्थापित करणाऱ्यांना कसा मिळणार? तरुणाईच्या अशा बेधुंद वर्तनामुळेच बलात्काराच्या घटना सर्रास घडताहेत. आजच्या तरुणाईला म्हणे ‘स्पेस हवीय, ती याच स्वातंत्र्यासाठी काय?
– अरुण डी. बी.
मराठी पुस्तक पुन्हा एकदा ‘गिफ्टच्या यादीत
Whats App आणि Facebook च्या काळात आजही तरुणाईचा कल वाचनाकडे आहे. ‘दुनियादारी拀मुळे पुन्हा एकदा ‘मराठी पुस्तक’ हे गिफ्ट्सच्या यादीत विराजमान झाले आहे. कॉलेज कट्टय़ावर, कॅन्टीनमध्ये, बस, ट्रेनमध्ये आजकाल लेटेस्ट मूव्हीप्रमाणे लेटेस्ट बुक्सवरही चर्चा रंगते. तरुणवर्ग वाचनापासून दूर गेलेला नाही, हे पुन्हा एकदा सिद्ध होत आहे. माझ्या आवडीची पुस्तकं ‘व्हिवा拀बरोबर शेअर करायला मला आवडेल. युगंधर (शिवाजी सावंत), संभवामि युगे युगे (प्रदीप दळवी), स्वामी ( रणजीत देसाई), महानायक (विश्वस पाटील), दौलत (ना. सी. फडके), बोक्या सातबंडे (दिलीप प्रभावळकर)
– विशाखा भोगले
@ व्हिवा पोस्ट viva.loksatta@gmail.com