आहारात चिकू खूप फायदेशीर असतो. चिकूत साखरेचे प्रमाण पुष्कळ असल्याने ती रक्तात मिसळून ताजेतवाने बनवते. चिकू खाल्ल्याने आतडय़ाची शक्ती वाढते. चिकूच्या झाडाच्या सालीमधून चिकट, दुधी रंगाचा ‘रसचिकल’ नावाचा डिंक काढण्यात येतो. त्यापासूनच च्युइंगगम बनवतात. चिकूपासून बनणाऱ्या काही रेसिपीज आजच्या मेन्यूकार्डमध्ये खास तुमच्यासाठी..

चिकूचे मूळ स्थान दक्षिण अमेरिकेच्या उष्णकटिबंधातील वेस्ट इंडीज हे आहे. तेथे हे फळ ‘चिकोज पेटी’ या नावाने ओळखले जाते. आपल्याला चिकू हे परदेशी फळ आहे हे सांगूनही पटणार नाही. अर्थात आता चिकू  सर्वच देशांत होतो. भारतात गुजरात, महाराष्ट्र, बिहार, बंगाल आणि उत्तर प्रदेशात चिकूचे पीक मुबलक येते. सुरत, ठाणे व कुलाबा जिल्हय़ातही चिकूची लागवड मोठय़ा प्रमाणात होते. चिकूचे झाड मजबूत व चिकट असते. दर तीन वर्षांनी या झाडामधून एकदाच तीन ते चार किलो दुधी रंग प्राप्त होतो. वारंवार रस काढण्यात आला, फळांच्या उत्पन्नावरही वाईट परिणाम होतो.
गोल चिकूपेक्षा लंबगोल चिकू खाण्यासाठी उत्तम असतात. पिकलेले चिकू व फलाहारात वापरले जातात. अनेक लोक पिकलेल्या चिकूचा हलवा बनवून खातात. दक्षिण अमेरिका, क्युबा व ब्राझीलमध्ये पिकलेल्या चिकूच्या गरापासून सरबत बनवण्यात येते. पाकिस्तान (सिंधमध्ये) कच्च्या चिकूची भाजीही बनवली जाते. आहार म्हणून चिकू खूप फायदेशीर असतात. चिकू खाल्ल्याने शरीरात एक प्रकारचा जोम व उत्साह संचारतो. त्यात साखरेचे प्रमाण पुष्कळ असल्याने ती रक्तात मिसळून ताजेतवाने बनवते. चिकू खाल्ल्याने आतडय़ाची शक्ती वाढते. चिकूच्या झाडातून ‘चिकल’ नावाचा पदार्थ बाहेर निघतो. चिकूच्या झाडाच्या सालीमधून चिकट, दुधी रंगाचा ‘रसचिकल’ नावाचा डिंक काढण्यात येतो. यातूनच चघळण्याच्या डिंक(च्युइंगम) बनवण्यात येतो. या िडकाचा उपयोग लहान लहान वस्तू चिकटवण्यासाठी होतो. याशिवाय डेंटल सर्जरीमध्ये ‘ट्रान्समिशन बेल्ट्स’ बनवण्यासाठी त्याचा वापर केला जातो.
चिकूमध्ये एकाहत्तर टक्के पाणी, दीड टक्के प्रोटीन, दीड टक्के चरबी आणि साडेपंचवीस टक्के काबरेहायड्रेट असते. याशिवाय त्यात ‘अ’ जीवनसत्त्व विपुल प्रमाणात असते व ‘क’ जीवनसत्त्व थोडय़ा प्रमाणात असते. शिवाय चिकूमध्ये चौदा टक्के साखर असते. त्यात फॉस्फरस व लोहही भरपूर प्रमाणात असते. तसेच क्षारही असतात. चिकूपासून तयार होणाऱ्या रेसिपीज्..

चिकूचा शेक
साहित्य : धुतलेले चिकू ४ नग, पिकलेले केळे – अर्धे, साखर चवीनुसार, दूध दोन कप, मिल्क पावडर दोन चमचे
कृती : सर्वप्रथम चिकू स्वच्छ धुऊन घ्यावे. नंतर चिकूचे साल काढून व बिया काढून त्यात सर्व जिन्नस मिसळवा व मिक्सरमध्ये घालून एकजीव करा. मिश्रण घट्ट वाटत असल्यास थोडेसे दूध घाला. सव्‍‌र्ह करते वेळी वरून व्हॅनिला आइस्क्रीमचा स्कूप घालून सव्‍‌र्ह करा.

चिकूची भाजी
साहित्य : चिकू (शक्यतो थोडे कच्चे चिकू वापरावेत) पाव किलो, जिरे फोडणीला, दही चार चमचे, भाजलेली कणिक एक चमचा,
बारीक चिरलेला लसूण अर्धा चमचा, हिरवी मिरची चार-पाच, हळद पाव चमचा, तूप दोन चमचे, दूध अर्धा कप.
कृती : पॅनमध्ये तूप गरम करून त्यात जिरे, लसूण, हिरवी मिरची, हळद, चिकूच्या फोडी घालून एक वाफ आणा. त्यानंतर एक चमचा कणकेची पेस्ट, घोटलेले दही, दोन चमचे फ्रेश, कोिथबीर, चवीनुसार मीठ, घालून सव्‍‌र्ह करा.
टीप : १. भाजी गरम असताना जास्त छान लागते.
२. ही भाजी सिंध प्रांत पाकिस्तान या भागात बघायला मिळते.

चिकूचा हलवा
साहित्य : चिकू अर्धा किलो, खवा १५० गॅम, साखर चवीनुसार, साजूक तूप ४ चमचे, वेलची पावडर एक चमचा, बदाम पिस्त्याचे काप पाव वाटी, दूध अर्धी वाटी.
कृती : चिकू चांगले धुवून साल काढून त्याचा गर काढून घ्या. नॉनस्टिक पॅनमध्ये तुपावर हा गर भाजून घ्या. यातला थोडा रस आटला की दूध गरम करून जरुरीपुरते घाला. खवा, साखर,
वेलची दाणे घालून चांगले मिसळून घ्या. वरून बदाम पिस्त्याचे काप, चांदीचा वर्ख लावून सव्‍‌र्ह करा.

चिकूचा जॅम
साहित्य : चिकूचा गर ५०० ग्रॅम, जिलेटिन दोन चमचे, साखर २०० ग्रॅम, एका िलबाचा रस.
कृती : चिकू चांगले धुवून साल काढून, गर काढून घ्यावा. नंतर मिक्सरवर साखर चिकूचा गर एकत्र करून हे मिश्रण नॉनस्टिक पॅनवर चांगले शिजवावे, थोडा िलबाचा रस पण घाला. मिश्रण आटेस्तोवर जिलेटिन पाण्यात मिसळून गरम करून त्यात मिसळा. सर्व मिश्रण चांगले आटल्यावर थंड करून बाटलीत भरून ठेवा.
टीप : जिलेटिन चालत नसल्यास घालू नका. पण गर थोडा जास्त घट्ट करा.

चिकूचा रायता
साहित्य : चिकू २५० ग्रॅम, गोड घट्ट मलईचं दही – अर्धा लिटर, भाजलेले जिरे – दोन चमचे, अध्र्या िलबाचा रस, भरडलेली काळी मिरी – अर्धा चमचा, साखर एक चमचा, मीठ चवीनुसार, बारीक चिरलेली कोिथबीर.
कृती : चिकूच्या फोडी करून घ्या. दही चांगलं घोटून त्यात चवीनुसार मीठ, साखर, अर्धा िलबाचा रस, जिरे, कोिथबीर, काळीमिरी किंवा बारीक चिरलेली हिरवी मिरची घालून चिकूच्या फोडी घालाव्यात व थंड करून सव्‍‌र्ह करा.
टीप : रायत्यासाठी चिकू शक्यतो कडक घ्यावेत.
दही घोटताना ते मिक्सरवर न घोटता कापडावर घोटावे. त्यामुळे दही घट्ट राहतं.