News Flash

हरयाणाच्या शिक्षणमंत्र्यांकडून हजारे यांच्या प्रकृतीची विचारपूस

हरयाणाच्या शिक्षणमंत्री गीता बुक्कल यांनी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास राळेगणसिद्घीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.

| December 30, 2013 02:00 am

हरयाणाच्या शिक्षणमंत्री गीता बुक्कल यांनी रविवारी दुपारी तीनच्या सुमारास राळेगणसिद्घीत ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.
बुक्कल त्यांच्या कुटुंबीयांसमवेत हजारे यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. हरयाणामधील शालेय शिक्षणाबाबत बुक्कल यांनी हजारे यांना माहिती दिली. राज्याच्या प्रत्येक शाळेमध्ये कॉम्प्युटर लॅब असून विद्यार्थ्यांना आधुनिक शिक्षण देण्यावर भर असल्याचे त्यांनी सांगितले. हरयाणाच्या शिक्षणपद्घतीवर हजारे यांनी समाधान व्यक्त करून शिक्षणपद्घतीची सविस्तर माहितीही त्यांनी बुक्कल यांच्याकडून जाणून घेतली. सुमारे तासभर बुक्कल व हजारे यांच्यात संवाद झाल्याचे अण्णांचे स्वीय सहायक दत्ता आवारी यांनी सांगितले.  
आपण केवळ अण्णांप्रति असलेल्या आस्थेपोटी त्यांच्या भेटीसाठी आलो आहोत. या भेटीमागे दुसरा कोणताही उद्देश नाही, असे बुक्कल यांनी सांगितले. हजारे यांची भेट घेतल्यानंतर राळेगणसिद्घीत राबविण्यात आलेल्या विविध योजनांची बुक्कल व त्यांच्या कुटुंबीयांनी पाहणी केली. हजारे यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात आलेले विविध प्रकल्प पाहून बुक्कल कुटुंबीय प्रभावित झाले. हरयाणातही अशाप्रकारचे प्रयोग राबविण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 30, 2013 2:00 am

Web Title: education minister of haryana enough constitutional of hazare
Next Stories
1 शिवाजी मखरे यांचा मृत्यू अपघाती की घातपाती?, नातेवाइकांना संशय
2 काँग्रेसच्या श्रीगोंदे तालुकाध्यक्षपदी भोईटे
3 चाकूचा धाक दाखवून मालमोटारचालकाला लुटले
Just Now!
X