News Flash

कराड तालुक्यात १३ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी २९ मार्चला मतदान

कराड तालुक्यातील जून २०१३ पर्यंत मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, येत्या २९ मार्चला मतदान होणार असल्याची माहिती

| February 25, 2013 08:32 am

कराड तालुक्यातील जून २०१३ पर्यंत मुदत संपणाऱ्या १३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुका व ८ ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुका जाहीर झाल्या असून, येत्या २९ मार्चला मतदान होणार असल्याची माहिती तहसीलदार सुधाकर भोसले यांनी दिली.
कराड तालुक्यात सार्वत्रिक निवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायती व कंसामध्ये निवडून द्यावयाच्या  सदस्यांची संख्या पुढीलप्रमाणे-
रेठरे बुद्रुक (१७), येवती (९), यशवंतनगर (१३), येणपे (९), टेंभू (११), हेळगांव (९), शेळकेवाडी-येवती (७), सयापूर (७), पिंपरी (७), काबीरवाडी (७), गोसावेवाडी (७), भोसलेवाडी (७), बानुगडेवाडी (७).
पोटनिवडणुका जाहीर झालेल्या ग्रामपंचायती पुढीलप्रमाणे – म्हासोली, नारायणवाडी, चोरे, कोडोली, टाळगाव, तासवडे, तांबवे व शिंगणवाडी. या ग्रामपंचायत निवडणुकांच्या पाश्र्वभूमीवर ग्रामपंचायत क्षेत्रात आचारसंहिता लागू झाली आहे. या निवडणूकांसाठी रेव्हिन्यू क्लब, कराड येथे ९ मार्च ते १४ मार्चपर्यंत सकाळी ११ ते दुपारी ३ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. त्यानंतर चिन्हवाटप होणार आहे. २९ मार्च रोजी सकाळी साडेसात ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत मतदान होणार आहे. ३० मार्चला सकाळी १० वाजल्यापासून मतमोजणी होणार आहे. या निवडणुकांमध्ये कोठेही अचारसहिता भंग होऊ नये म्हणून महसूल व पोलीस यंत्रणेने नियोजन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 25, 2013 8:32 am

Web Title: election for 13 village councils on 29th march in karad taluka
Next Stories
1 कष्टाचा पैसा, पुण्याई व जीवन विद्या सुखी जीवनाची त्रिसूत्री – प्रल्हादराव पै
2 पैशात कुठे अहो, रुपयात तरी मजुरी द्या
3 चंदगड विधानसभा पोटनिवडणुकीत ६५ टक्के मतदान
Just Now!
X