11 December 2017

News Flash

अंजनगावसुर्जी तालुक्यातील चौघे अद्यापही बेपत्ताच

गेल्या पाच महिन्यात अंजनगावसुर्जी तालुक्यामधून विद्यार्थी, पदवीधर पोलीस पाटील, सधन शेतकरी आणि एक गृहिणी

प्रतिनिधी, अमरावती | Updated: February 14, 2013 1:10 AM

गेल्या पाच महिन्यात अंजनगावसुर्जी तालुक्यामधून विद्यार्थी, पदवीधर पोलीस पाटील, सधन शेतकरी आणि एक गृहिणी बेपत्ता झाली आहे. या चौघांचा शोध घेण्यास पोलिसांना अद्यापही यश आले नसल्याने या चार कुटुंबात चिंतेचे वातावरण पसरले आहे.
अंजनगावसुर्जी तालुक्यातील हुसेनपूर खोडगाव येथील प्रभा दादाराव ताडे ही चाळीस वर्षांची गृहिणी ३ ऑगस्टपासून तर, पोलीस पाटील संघटनेचे जिल्हा अध्यक्ष, शेकापूर पोही येथील पोलीस पाटील रामदास ज्ञानदेव मानकर (५५) हे गेल्या २२ नोव्हेंबरपासून बेपत्ता आहे.
वनोजा येथील गजानन रामदास चिंचोळकर हे पन्नास वर्षांचे शेतकरी १४ जानेवारीपासून बेपत्ता आहे, तर अंजनगावसुर्जी येथील सुशांत अनिल बोडखे हा विद्यार्थी ३ फेब्रुवारीपासून अकोला येथून बेपत्ता झाला आहे.
या साऱ्यांच्या चिंतित कुटुंबीयांनी अंजनगाव, रहिमापूर चिंचोली व सिव्हील लाईन्स अकोला पोलीस ठाण्यासह   जिल्हा   पोलीस   अधीक्षक   अमरावती व   अकोला   यांच्याकडे   तक्रारी दाखल केल्या आहे.

First Published on February 14, 2013 1:10 am

Web Title: four peoples are missing from anjangoansurji distrect